मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
बातम्या
खेड तालुक्यात नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत ३२ हजार शेतकरी
यंदा शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी काही प्रमाणात निधी मिळाला आहे. त्याचे वितरण करण्यात आले आहे.
- सुत्रित्रा आमले, तहसीलदार, खेड
पुणे : खरिपात पावसाने खेड तालुक्यात चांगलीच हजेरी लावली. यामुळे तालुक्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे ३५ हजार ३८९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यापैकी २१ गावांतील दोन हजार ८२३ शेतकऱ्यांना एक कोटी ६० लाख ९८ हजार रुपयांची नुकसानभरपाई वाटप करण्यात आली आहे. अजूनही ३२ हजार ५६६ शेतकरी सुमारे आठ कोटी १३ लाख ७६० रुपयांची नुकसानभरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यातील खेड तालुक्यात अवकाळी पावसामुळे तालुक्यातील ३५ हजार ३८९ शेतकऱ्यांचे १२ हजार १६३ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. तालुक्यात खरीप हंगामात ४४ हार ४१६ हेक्टर क्षेत्रात विविध पिकांची पेरणी केली होती.
तालुक्यात सप्टेंबर, आॅक्टोबर आणि नोव्हेबर महिन्यात अवकाळी, मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. या वेळी नगदी पिकांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. खेड तालुक्यात महसुली गावातील महसूल विभागाच्या अधिपत्याखाली नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण झाले. तरीही शासनाकडून नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.
शासनाने जिरायत खरीप पिकांना हेक्टरी आठ हजार रुपये जाहीर केले. त्याप्रमाणे १२ हजार १५३ हेक्टरसाठी सुमारे नऊ कोटी ७२ लाख २८ हजार १६० रुपये होतात. फळबागांच्या नुकसानीसाठी हेक्टरी १८ हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे. त्या प्रमाणे १०.२० हेक्टर फळपिकांच्या नुकसानीपोटी एक लाख ८३ हजार ६०० रुपये होतात. असे एकूण ९ कोटी ७४ लाख ११ हजार ७६० रुपयांपैकी २१ गावांतील दोन हजार ८२३ शेतकऱ्यांना एक कोटी ६० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.
- 1 of 1504
- ››