सांगलीत गुळाला प्रतिक्विंटल ३२०० ते ३६८५ रुपये

सांगलीत गुळाला प्रतिक्विंटल ३२०० ते ३६८५ रुपये
सांगलीत गुळाला प्रतिक्विंटल ३२०० ते ३६८५ रुपये

सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाची १३१२ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल ३२०० ते ३६८५, तर सरासरी ३४४३ असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

 विष्णूअण्णा पाटील दुय्यम भाजीपाला व फळे मार्केट आवारात कांद्याची २४५४ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल ३०० ते १२५०, तर सरासरी ८०० रुपये दर मिळाला. बटाट्याच्या आवकेत काहीशी वाढ झाली. त्याची १०२८ क्विंटल होऊन प्रतिक्विंटल १२०० ते १४००, तर सरासरी १४०० रुपयांचा दर मिळाला. लसणाची आवक आठवड्यातून दोन वेळाच होत आहे. मोसंबीची ४७८ डझन आवक झाली. त्यास प्रतिडझन २०० ते ४००. तर सरासरी ३०० रुपये दर मिळाला.

 डाळिंबाची १३५० डझनाची आवक झाली. त्याला प्रतिदहा किलो २०० ते ५००, तर सरासरी ४५० रुपयांचा दर राहिला. कलिंगडाची आवक १६७ डझन, तर दर २०० ते ५००, तर सरासरी ४००, अननसाची आवक २५० डझन, तर दर प्रतिडझन ३०० ते ५००, तर सरासरी ३५०, सफरचंदाची आवक २१२० पेटी, तर दर प्रतिपेटी ४०० ते १०००, सरासरी ७००, बोरांची आवक ४० क्विंटल, तर दर प्रतिक्विंटल ६०० ते १७००, सरासरी १५०० रुपये असा राहिला. शिवाजी मंडईत भाजीपाल्याची आवक कमी अधिक राहिली. वांग्याची ५० क्रेट आवक झाली. त्यास प्रतिदहा किलो ४०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. ढोबळी मिरचीची ६० पोत्यांची आवक झाली. तिला प्रतिदहा किलो ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. मेथीची १५०० ते २००० पेंड्यांची आवक, तर दर प्रतिपेंडी १० ते १५, चाकवतीची १५०० पेंडी आवक, तर दर प्रतिपेंडी १० ते १५ रुपये मिळाला. भाजीपाल्यांची आवक कमी असल्याने त्याचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com