पुणे जिल्हा बँकेकडून ३३ टक्के पीक कर्जवाटप 

पुणे जिल्हा बँकेकडून ३३ टक्के पीक कर्जवाटप 
पुणे जिल्हा बँकेकडून ३३ टक्के पीक कर्जवाटप 

पुणे ः रब्बी हंगामात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंने (पीडीसीसी) सभासद शेतकऱ्यांसाठी ७२७ कोटी ९१ लाख ७५ हजार रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्‍चित केलेले आहे. त्यापैकी आतापर्यंत २३८ कोटी ८२ लाख ५६ हजार म्हणजे सरासरीच्या ३२.८१ टक्के वाटप पूर्ण झालेले आहे. एकूण ४२ हजार १६७ शेतकऱ्यांच्या ३४ हजार १६५ हेक्टर क्षेत्रासाठी पीककर्ज वाटप करण्यात आलेले आहे. 

गतवर्षी म्हणजे रब्बी हंगाम २०१८ मध्ये हेच प्रमाण २७.५५ टक्के इतके होते. याचा विचार करता पीक कर्जवाटपात दुष्काळी स्थिती असूनही वाढ झाल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक कर्जवाटप केले जाते. नियमित आणि वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून रुपये तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्धता करून दिली जाते. 

चालू वर्षी खरीप हंगामातील क्षेत्राशिवाय शिल्लक क्षेत्रावरही शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप झालेले आहे. तसेच थकीत पीक कर्जभरणा करण्यासही शेतकऱ्यांनी सुरवात केलेली आहे. खरीप हंगामात घेतलेल्या पीककर्जाची परतफेड मार्च महिन्यापूर्वी शेतकऱ्यांना करायची आहे. ती रक्कमही भरणा करण्याचे प्रमाण मार्च महिन्यात वाढण्याची अपेक्षा असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली.

पीक कर्जवाटपाची स्थिती (लाख रुपयांमध्ये)  
तालुका उद्दिष्ट रक्कम वाटप रक्कम टक्केवारी
आंबेगाव ५९१९.३० ३७५३.३७ ६३.४२
बारामती ७८२१.३४ १६३७.८२ २०.९४
भोर ३२४७.८६ १५२३.९९ ४६.९२
दौंड ११०९७.७१ १८००.५७ १६.२२
हवेली २३७९.५७ ७०६.७६ २९.७०
इंदापुर १०३३४.७० १९१४.८४ १८.५३
जुन्नर ७३१९.९० ३६९९.७२ ५०.५४
खेड ७१५४.६३ ३८०१ ५३.१३
मावळ १७१२.२५ १२८६.२९ ७५.१२
मुळशी १७००.७५ ६७६.४७ ३९.७७
पुरंदर ५३७७.७३ ९०७.६० १६.८८
शिरूर ७५८०.८६ १९२५.८० २५.४०
वेल्हा ११४३.१५ २४७.०४ २१.६१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com