परभणीतील ‘पशुवैद्यकीय’चे ३३ कर्मचारी ‘कायम’च्या प्रतीक्षेत

परभणीतील ‘पशुवैद्यकीय’चे ३३ कर्मचारी ‘कायम’च्या प्रतीक्षेत
परभणीतील ‘पशुवैद्यकीय’चे ३३ कर्मचारी ‘कायम’च्या प्रतीक्षेत

परभणी : नागपूर येथील महाराष्ट्र पशूू व मत्स्यविज्ञान विद्यापीठांतर्गत येथील पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयातील ३३ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार कायम पदस्थापना प्रलंबित आहेत. सेवेत कायम करून घेण्यात यावे या मागणीसाठी एका कर्मचाऱ्याने मंगळवारी (ता. १) पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सतर्कतेमुळे पोलिसांनी हाणून पाडला. पशू आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठ स्थापनेपूर्वी कृषी विद्यापीठातर्गत असलेल्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील ३३ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा सेवा ज्येष्ठतेनुसार कायम पदस्थापनेचा प्रश्न ३५ ते ४० वर्षांपासून प्रलंबित आहे. त्या वेळी कृषी विद्यापीठामध्ये रोजंदारीवर असलेल्या अनेक मजुरांना कायम पदस्थापना देण्यात आली. परंतु पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठांतर्गतच्या येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील ३३ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या कायम पदस्थापनेचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.  या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याबाबत पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ सकारात्मक असल्याचे प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय यांनी सांगितले. परंतु मंगळवारी (ता. ८) सेवानिवृत्त होत असलेले पशुपरिचर शेख शकील अहमद शेख रहीम यांनी पूर्वलक्षी प्रभावाने सेवेत कायम करून फरकासह शासकीय सेवेचे फायदे देण्यात यावेत, अशी अन्यथा मंगळवारी (ता. १) आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने याबाबत पोलिसांना कळविलेले होते. शेख शकील यांनी मंगळवारी (ता. १) पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी तो हाणून पाडला. या प्रकरणी नवा मोंढा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com