agriculture news in Marathi 33 percent fund cutting in cropsap project Maharashtra | Page 2 ||| Agrowon

`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या स्थितीमुळे कृषी खात्याला यंदा ९ हजार शेतीशाळा घेता आलेल्या नाहीत. 

पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या स्थितीमुळे कृषी खात्याला यंदा ९ हजार शेतीशाळा घेता आलेल्या नाहीत. तसेच, निधीत देखील ३३ कोटी रुपयांची कपात करावी लागली. मात्र, काही गावांमध्ये ‘झूम’वर देखील शेतीशाळा सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

`क्रॉपसॅप` योजनेतील आठ पिकांच्या व्यतिरिक्त इतर पिकांसाठी शेतीशाळांवर निधी खर्च केल्यास अतिरिक्त निधी दिला जाणार नाही, असे राज्यातील कृषी अधिकाऱ्यांना यापूर्वीच बजावण्यात आले आहे. आधीच्या प्रस्तावानुसार राज्यात क्रॉपसॅपवर ५० कोटी रुपये खर्च केले जाणार होते. मात्र, कोविडमुळे ३३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी कापला गेला. कीडरोगाचे सर्वेक्षण आणि शेतकऱ्यांना सल्ला देणे, असे दोन मुख्य हेतू क्रॉपसॅपचे आहेत. 

‘‘राज्यात यंदा विविध योजनांमधून २५ हजार शेतीशाळा घेतल्या जाणार होत्या. मात्र, त्यात कपात करून शेवटी १६ हजार शेतीशाळांचे नियोजन करण्यात आले. निधी कपातीमुळे आधी ठरविल्याप्रमाणे तीन कोटी रुपये निधी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाइन सुविधेसाठी दिला जाणार होता. इंटरनेटसाठी खर्च अद्याप देण्यात आला नसला तरी त्यासाठी हालचाली सुरू आहेत,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

‘‘राज्यात क्रॉपसॅप प्रकल्प राबविताना शेतीशाळा घेण्यास मान्यता दिली आहे. मात्र, इतर प्रकल्पांमधून देखील शेतीशाळा होत असल्याने याचा खर्च त्याच्यात दाखविण्याची ‘जादू’ होऊ शकते. त्यामुळे आम्ही क्रॉपसॅप योजनेतील पिके वगळता इतर पिकांचा खर्च मंजूर न करण्याचे कळविले आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

बोगस शेतीशाळांना आळा
लक्ष्यांकापेक्षा जादा शेतीशाळा घेतल्यास ती बाब संशयास्पद राहील. तसेच जादा शेतीशाळा घेतल्यास त्या विनाअनुदानित असतील, असे कृषी आयुक्तालयाने यापूर्वीच राज्यभर कळविले आहे. ‘‘बोगस शेतीशाळांबाबत शंका घेतली जात असली तरी तसे आता होत नाही. कारण, शेतीशाळेचे ठिकाण जिओ टॅगिंग करणे बंधनकारक आहे. शेतीशाळा एकूण दहा वर्गात घेणे अपेक्षित आहे. १४ हजार रुपये खर्च मंजूर केला जातो,’’ असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात उकाडा वाढण्यास सुरूवात  पुणे ः परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार...
पीकविमा परतावा तात्काळ द्या, अन्यथा...अमरावती : जिल्ह्यात एआयसी कंपनीच्या (ॲग्रिकल्चर...
कापूस उत्पादनात मोठी घट, पीक परवडेनाजळगाव ः अतिपावसात १२ एकर कापूस पिकात फूलगळ झाली....
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
‘कडकनाथ’ कुक्कुटपालनात निर्माण केल्या...आडगाव (नाशिक) येथील संदीप सोनवणे यांचा १००...
व्यवहारापलिकडचा विचारदसऱ्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
आत्मनिर्भर नव्हे, समृद्ध होऊ याशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते स्व. भास्करभाऊ बोरावके...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...
‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी...मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान...
शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा:...अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता...
व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे...अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत...
सरकारी मदतीबरोबरच विमा भरपाईही मिळणारपुणे: राज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान...
आधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञानचाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे...