सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणे

सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते, बियाणांच्या पुरेशा उपलब्धतेसाठी कृषी विभागाने आत्तापासून नियोजन सुरू केले आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र २ लाख ५७ हजार ६९२ हेक्‍टर आहे. जिल्ह्यासाठी विविध प्रकारचे ३३ हजार क्विंटल बियाणे, १ लाख ६६ हजार ३२५ टन खतांची मागणी केलेली आहे.
33,000 quintals of seeds for rabbis in Sangli
33,000 quintals of seeds for rabbis in Sangli

सांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते, बियाणांच्या पुरेशा उपलब्धतेसाठी कृषी विभागाने आत्तापासून नियोजन सुरू केले आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र २ लाख ५७ हजार ६९२ हेक्‍टर आहे. जिल्ह्यासाठी विविध प्रकारचे ३३ हजार क्विंटल बियाणे, १ लाख ६६ हजार ३२५ टन खतांची मागणी केलेली आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात १५१ गावांचा समावेश आहे. बियाणांची कमतरता, गुणवत्ता तपासण्यासाठी पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. हंगामात शाळू ज्वारी, हरभरा, मक्‍याचे क्षेत्र सर्वाधिक असते. अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील आटपाडी आणि जत तालुक्यात रब्बीचे क्षेत्र अधिक असून तालुक्‍यात असून शाळू ज्वारीची पेरणी केली जाते. त्यानंतर जत, कवठेमहांकाळ, तासगाव व मिरज पूर्व भागात रब्बी हंगामाचे क्षेत्र आहे. रब्बी हंगामात शाळू ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, सूर्यफूल, भुईमूग, तीळ ही प्रामुख्याने पिके घेतली जातात. शाळूचे पीक सर्वाधिक घेतले जाते. शेतकरी प्रत्येक वर्षी बीजप्रक्रिया केलेले बियाणेच वापरतात. यामुळे चांगले उत्पादन मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. काही मोजकेच शेतकरी घरातील बियाणांवर प्रक्रिया करून वापरत असल्याचे चित्र आहे.

म्हैसाळ, टेंभूतील पाणीसाठा रब्बीला फायद्याचा महापुराच्या काळात सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांतील बंधारे पाण्याने भरून घेण्यात आले आहेत. त्यासाठी १.७५ टीएमसी पाणी साठवले आहे. या साठवलेल्या पाण्याचा रब्बीतील ३० हजार हेक्‍टर क्षेत्राला फायदा होणार आहे. यामुळे कमी पावसाच्या काळात या तलावातील पाणी शेतीसाठी परवानगी घेऊन वापरता येणार आहे. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी राखीव साठा ठेवण्याची आवश्‍यकता नसल्याने शेतीसाठी त्याचा वापर होऊ शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com