agriculture news in marathi 335 crore for assistance in Solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात मदतीसाठी ३३५ कोटींची मागणी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

सोलापूर : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ४६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आता या नुकसानीपोटी ३३५ कोटी १६ लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे. 

सोलापूर : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ४६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आता या नुकसानीपोटी ३३५ कोटी १६ लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे. 

पंधरवड्यापूर्वी १४ ते १६ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ४६५ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यामध्ये ३ लाख १३ हजार ८१० हेक्टरवरील जिरायती व आठमाही बागायती पिकांचे, तर ६७ हजार ६५१ हेक्टरवरील बारमाही पिकांचे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीमुळे जमीन खरडून जाणे, जमीन वाहून जाणे, माती वाहून जाणे, गाळ साचणे यासाठीही शासनाकडून मदत दिली जाते. २ हजार ४५ हेक्टरवरील जमीन खरडणे, खचणे अशा घटना झाल्या आहेत. त्यापोटी ७.६७ कोटीची रक्कम आवश्यक आहे. ७११ हेक्टरवर शेत जमिनीवरील गाळ वाहून जाणे, गाळाचा थर साचण्याचे प्रकार झाले आहेत. या पोटी ८६.७५ लाख रुपयांची मागणी केली 
आहे.

तालुकानिहाय नुकसानक्षेत्र (हेक्टर) आणि कंसात रक्कम

उत्तर सोलापूर  १८०१२ (१३.६३ कोटी)
बार्शी ६८८६८ (५४.२० कोटी) 
दक्षिण सोलापूर २१६०० (१५.२८ कोटी)
अक्कलकोट  ४३५२४ (३१.१० कोटी) 
माढा  ४३९१२ (३८.११ कोटी) 
करमाळा  १८२३० (१३.४२ कोटी) 
पंढरपूर ६५,००० (६४.३६ कोटी)
मोहोळ २७१३६ (२४.०२ कोटी) 
मंगळवेढा ३१५०३ (२७.८७ कोटी) 
सांगोला  २६७६६ (३७.१६ कोटी)
माळशिरस १६९०९ (१५.९६ कोटी) 
एकूण ३ लाख ८१, ४६२ (३३५.१६ कोटी)

 


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
एफआरपीप्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील बैठक...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही...
नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...नांदेड : खरिपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी...
शहीद नितीन भालेराव अनंतात विलीननाशिक : भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलिस...
डाळिंब, आंब्याच्या विम्यासाठी ३१...नाशिक : ‘‘राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित...
परभणी, पाथरी, गंगाखेडमधील कापसाची...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
परभणीतील अपात्र शेतकऱ्यांकडून ‘शेतकरी...परभणी : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम- किसान...
खानदेशात रब्बीसाठी आवर्तनांची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात सर्वच प्रकल्पांमधील जलसाठे मुबलक...
औरंगाबाद, बीड जिल्ह्यात विशेष पथके...औरंगाबाद : औरंगाबाद व बीड जिल्ह्यात बिबट्याच्या...
जळगाव जिल्हा परिषदेत रिक्त पदांमुळे...जळगाव : ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा...
अंबड तालुक्यात चार ठिकाणी कापूस खरेदी...अंबड, जि. जालना : तालुक्यात चार ठिकाणी कापूस...
पपई उत्पादकांना खर्चही निघेनाअकोला : पारंपरिक पिकांची चाकोरी सोडत शेतकरी...
मराठवाड्यात तुरीवरच शेतकऱ्यांचे आर्थिक...औरंगाबाद : यंदा अतिपावसाने उडीद, सोयाबीनचे अतोनात...
खडकपूर्णा धरणाचे आवर्तन अखेर सुरूबुलडाणा : देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना...
...तर महावितरणचे कार्यालय जाळणार :  आ....अमरावती :  वरुड, मोर्शी तालुक्यांत...
मक्यावर अमेरिकन लष्करी अळीनगर  : नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा परिसरात...
पुण्यात भात काढणी अंतिम टप्प्यातपुणे  : दिवाळी सणामुळे भात पट्यात अनेक...
टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणीकडेगाव, जि. सांगली  : रब्बी हंगामासाठी टेंभू...
सांगलीत एफआरपीची प्रतीक्षासांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस...
शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत ठाकरे सरकार...नांदेड : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी...