सांगली जिल्ह्यात ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक 

सांगली : जिल्ह्यात गेल्यावर्षी याच तारखेला तलावांत नऊ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी ३४ टक्के पाणीसाठा असून जत तालुक्यातील चार तलाव कोरडे पडले आहेत. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू असल्याने पाणी टंचाईच्या झळा कमी झाल्या आहेत.
34 percent water storage in Sangli district
34 percent water storage in Sangli district

सांगली : जिल्ह्यात गेल्यावर्षी याच तारखेला तलावांत नऊ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी ३४ टक्के पाणीसाठा असून जत तालुक्यातील चार तलाव कोरडे पडले आहेत. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू असल्याने पाणी टंचाईच्या झळा कमी झाल्या आहेत. 

जिल्ह्यातील पाच मध्यम आणि ७९ लघू प्रकल्पांमध्ये ९ हजार ४४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता आहे. सध्या ८४ प्रकल्पांत ३ हजार ८६० दशलक्ष घन फूट पाणीसाठा आहे. जत तालुक्यातील चार तलाव कोरडे पडले आहेत. तेथे पाणी टंचाई असून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू केले आहेत. चौदा तलावात मृत पाणीसाठा आहे. यामध्ये जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यातील तलावांचा समावेश आहे. २५ टक्के पाणीसाठा १५ तलावात, तर २७ तलावात ५० टक्के पाणीसाठा आहे. बावीस तलावांमध्ये ७५ टक्के पाणीसाठा आहे. 

मिरज तालुक्यातील भोसे आणि जत तालुक्यातील बिरनाळ तलावात ७५ टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात भयानक दुष्काळ पडला होता. त्यातच अपेक्षित पाऊस झाला नव्हता. त्यामुळे पाणी टंचाई भीषण होती. गतवर्षी ८४ प्रकल्पात ९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. परंतू मॉन्सून आणि परतीचा पाऊस चांगला झाल्याने जिल्ह्यात पाणीसाठा ३४ टक्के आहे. मात्र, जत, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुक्यात काही गावांमध्ये पाणी टंचाई आहे. सध्या तिन्ही योजना सुरू असून लाभ क्षेत्रातील तलाव, पाझर तलाव, विहिरी बंधारे भरुन दिले तर या तालुक्यातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com