‘मनरेगा’तून होणार राज्यात ३५ हजार कामे

नागपूरः लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या घटकांना दिलासा देण्यासाठी ‘मनरेगा’तून रोजगाराचा हात पुढे करण्यात आला आहे. राज्यात या योजनेतून वैयक्‍तिक तसेच सामूहिक स्वरुपाच्या ३५ हजार कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
34 thousand works will start in the State through 'MGNREGA'
34 thousand works will start in the State through 'MGNREGA'

नागपूर ः लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या घटकांना दिलासा देण्यासाठी ‘मनरेगा’तून रोजगाराचा हात पुढे करण्यात आला आहे. राज्यात या योजनेतून वैयक्‍तिक तसेच सामूहिक स्वरुपाच्या ३५ हजार कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

‘कोरोना’ नियंत्रणासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उद्योग तसेच वाणिज्यिक उपक्रम यामुळे बंद असल्याने त्यातील कामगारांना याचा फटका बसला आहे. तीन मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र शासनाने शिफारस केलेल्या सोशल डिस्टन्सिंग विषयक नियमांचे पालन करीत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.

त्यामुळे जलसंधारण, गोठ्यांचे बांधकाम, व्हर्मी कंपोस्ट, फलोत्पादन, मजगी आदी वैयक्‍तिक स्वरुपाच्या कामांसोबतच शेतीला जोडणारे रस्ते, नाला सरळीरण, सामूहिक विहिरी, वृक्षारोपणाची पूर्वतयारी तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे घेणे सुलभ झाले असल्याची माहिती मनरेगा आयुक्‍त ए. एस. आर. नायक यांनी दिली. 

२६ हजार ८८६ ग्रामपंचायतींमध्ये एकही काम सुरू नसल्याने रोजगाराचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे मनरेगातून ४ हजार २०८ सिंचन विहिरी, ५ हजार ३०४ पशुगोठे, ८ हजार ३६६ शोकपीट त्यासोबतच शेततळी, मजगी, विहीर पुर्नभरण आदी कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. नागपूर विभागात ५ हजार २५८ कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com