सोलापूर जिल्ह्यात ३४० सौर कृषिपंप कार्यान्वित

340 Solar Agri Pumps operational in Solapur district
340 Solar Agri Pumps operational in Solapur district

सोलापूर : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमधून जिल्ह्यात आतापर्यंत ३४० सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. त्यांची वीजबिलातूनही मुक्तता झाली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या निकषानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात आतापर्यंत २१८० शेतकऱ्यांना कोटेशन देण्यात आले आहे. त्यातील १३३८ शेतकऱ्यांनी कोटेशनच्या रकमेचा भरणा केला आहे. शेतकऱ्यांनी निवडलेल्या एजन्सीजना महावितरणकडून वर्क आर्डर देण्यात येत आहे. त्याप्रमाणे तीन एचपी क्षमतेचे २७८ आणि पाच एचपी क्षमतेचे ६२ असे एकूण ३४० सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. 

कृषिपंपांना पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यासाठी ६३ केव्ही किंवा १०० केव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र उभारण्यात येतात. त्यावरील लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र वीजचोरी, इतर तांत्रिक बिघाड, विद्युत अपघात, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा धोका यासारख्या अडचणी येतात. दुर्गम व डोंगराळ भागात वीज यंत्रणेचे जाळे नसलेल्या भागात डिझेल इंधनाचा वापर करून कृषिपंप चालविले जातात. या सर्वांसाठी पर्याय म्हणून दिवसा तसेच शाश्वत व अखंडित वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी सौर कृषिपंप योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. 

या पंपामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. याशिवाय बॅटरी चार्जिंगची सोय असल्याने बॅटरीद्वारे शेतामधील घराला रात्रीच्या वेळी वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. सौर कृषिपंपाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पाच वर्ष, तर सौर पॅनलसाठी दहा वर्षांचा हमी कालावधी राहणार आहे. या हमी कालावधीत सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त झाल्यास विनामुल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीची राहणार आहे. 

या शेतकऱ्यांना लाभ 

शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे. यापूर्वी कृषिपंपासाठी वीजजोडणी घेतलेली नाही किंवा शुल्क भरूनही वीजजोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून सौर कृषिपंप देण्यात येत आहेत. यामध्ये सोलर पॅनेल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे व इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे. 

सर्वसाधारणसाठी १० टक्के लाभार्थी हिस्सा

सुमारे २५ वर्ष सेवा देऊ शकणाऱ्या सौर कृषिपंपाचा देखभाल खर्च अत्यंत कमी आहे. तसेच शेतकऱ्यांची वीजबिलांपासूनसुद्धा मुक्तता होणार आहे. तीन व पाच एचपी क्षमतेच्या सौर कृषिपंप योजनेसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी १० टक्के आणि अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी ५ टक्के रक्कम लाभार्थी हिस्सा असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com