agriculture news in marathi, 34.92 lakh tonnes wheat procured in Punjab | Page 2 ||| Agrowon

पंजाबात गव्हाची ३५ लाख टन खरेदी

वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

चंडिगड : पंजाब राज्यात बुधवार (ता.१८) पर्यंत ३४.९२ लाख मेट्रिक टन गव्हाची शासकीय खरेदी झाली आहे. रब्बी हंगामातील गहू खरेदीचे आत्तापर्यंतचे लक्ष पंजाब सरकारने गाठले आहे. शासकीय खरेदीत राज्य सरकारकडून विशेष खरबदारी घेण्यात येत असून, मुख्यमंत्र्यांसह सर्व खरेदी संस्थांचे प्रमुख जातीने लक्ष देत आहेत. 

चंडिगड : पंजाब राज्यात बुधवार (ता.१८) पर्यंत ३४.९२ लाख मेट्रिक टन गव्हाची शासकीय खरेदी झाली आहे. रब्बी हंगामातील गहू खरेदीचे आत्तापर्यंतचे लक्ष पंजाब सरकारने गाठले आहे. शासकीय खरेदीत राज्य सरकारकडून विशेष खरबदारी घेण्यात येत असून, मुख्यमंत्र्यांसह सर्व खरेदी संस्थांचे प्रमुख जातीने लक्ष देत आहेत. 

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सूचनांनुसार राज्यातील शासकीय खरेदी संस्थांचे प्रमुख, व्यवस्थापकीय संचालक व्यक्तीगत राज्यातील सर्व बाजारसमित्यांत सुरू असलेल्या खरेदीवर लक्ष ठेऊन आहेत, यामुळे कोठेही शासकीय खरेदी प्रक्रिया मंदावलेली नसल्याचे अधिकृत प्रवक्त्याने सांगितले. खरेदी प्रक्रियेत कोणतीही समस्या उद्‌भवल्यास खरेदी संस्थांचे प्रमुख अथवा व्यवस्थापकीय संचालक विनाविलंब त्याचे निराकारण करतात. यासंदर्भातील कोणतीही ढिलाई सहन न करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येत असलेल्या या गव्हाचे पेमेंटही निर्धारित कालावधीत पूर्ण केले जात आहे. १८ एप्रिलपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना १८८५.३० कोटी रुपये परतावा देण्यात अाल्याचे प्रवक्त्याने सांगितले. सध्या गहू खरेदीला सर्वोच्च प्राधान्य राज्य सरकारने दिले आहे. राज्यातील सर्व संस्थांना याकरिता चालना देण्यात आली असून  १३० लाख टन गहू खरेदीचे यंदाचे लक्ष असणार आहे. शेतकऱ्यांना लांबचा प्रवास करावा लागू नये म्हणून राज्यातील १८३६ बाजार समित्यांत (मंडी) खरेदी केली जात आहे. 

नव्या आवकेला जागा उपलब्ध व्हावी म्हणून आलेल्या मालाची तत्काळ एफसीआयसह इतर खरेदी संस्थांच्या गोदामांमध्ये रवानगी केली जात आहे. माल वाहतुकीसाठी एप्रिल आणि मे २०१८ या दोन महिन्यांकरिता सुमारे ४०० विशेष रेल्वेचे नियोजन भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय)ने केले आहे. 

केंद्र सरकार आणि भारतीय अन्न महामंडळाच्या निर्देशांनुसार राज्य सरकारकडून विविध खरेदी संस्थांवर पडणाऱ्या बोजांचे ओझे कमी करण्यासाठी पाऊले उचलत आहेत. गेल्यावर्षीच्या दरापेक्षा अधिक ३०० ते ४०० रुपये परताव्यासह गहू वाहतुकीकरिता मूळदराच्या तुलनेत यंदा १२० टक्के अधिकचे टेंडर देण्यात आले अाहे. काही ठिकाणी झालेल्या हलक्या पावसाने अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी, तत्काळ सोडविण्यात आल्याचे प्रवक्त्याने सांगितले. 


इतर अॅग्रोमनी
तूर आयातीचा परिणाम दीर्घकाळ कमीच राहील पुणे ः सरकारने वित्तीय वर्ष २०२१-२२ साठी ६ लाख टन...
राज्यातून २० लाख टन साखरनिर्यातीचे करार कोल्हापूर ः यंदा साखर उत्पादनाबरोबरच...
आयातीने तुरीच्या दरावर परिणाम शक्य पुणे ः उडीद आयातीला गेल्या आठवड्यात परवानगी...
आवक वाढूनही हरभरा दर टिकून पुणे ः यंदा हरभरा उत्पादनात घटीचा अंदाज आणि सण...
देशातील कापूस उत्पादन ३५८ लाख गाठींवर...नवी दिल्ली ः देशात यापूर्वी कापसाचे ३६० लाख गाठी...
मोहरीला दराचा ‘तडका’ पुणे ः राजस्थानमध्ये मोहरीच्या दराने हमीभावाचा...
हळदीची आवक वाढू लागली सांगली/परभणी ः बाजार समित्यांत हळदीची आवक वाढू...
देशात विक्रमी फलोत्पादनाचा अंदाज पुणे ः देशात २०२०-२१ मध्ये फलोत्पादनात फळांचे १०३...
चीनकडून शेतीमालाची आक्रमक खरेदी पुणे ः जागतिक पातळीवर जवळपास सर्वच शेतमालाची...
हरभरा दरात घसरणीची शक्यता कमीपुणे ः हरभरा आवक वाढत असून पुढील १० ते १२ दिवसांत...
तेलबिया उत्पादनात वाढ वॉशिंग्टन ः जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी...
सांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढलीसांगली ः  कोरोना विषाणूचा वाढता...
सरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घट यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...
देशात साखर उत्पादनात ४० लाख टनांनी वाढलेकोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी...
केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता अनेक...नवी दिल्ली ः केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता...
पाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...
हरभरा बाजारात सुधाराची चिन्हे पुणे ः बाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे....
बाजारात तूर खातेय भाव; वाढ कायम पुणे ः इतर कडधान्य पिकांसह तूर उत्पादनातही घट...
हळदीला दराचा ‘रंग’ पुणे ः हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर...
अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी...