agriculture news in marathi, 3.5 Crore Crop Loan distribute in Nanded, Parbhani, Hingoli district | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत साडेतीनशे कोटींचे पीक कर्जवाटप
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 जून 2019

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील बॅंकांनी यंदाच्या खरीप हंगामात आजवर ६८ हजार ५४८ शेतकऱ्यांना ३५० कोटी ६४ लाख ६० हजार रुपयांचे पीक कर्जवाटप केले. उद्दिष्टांपैकी नांदेड जिल्ह्यात १०.०६ टक्के, परभणीत ६.६९ टक्के, हिंगोलीत ५४.६७ टक्के पीक कर्जवाटप झाले. या तीन जिल्ह्यांत जिल्हा बॅंकेने पीक कर्जवाटपात आघाडी घेतली आहे. राष्ट्रीयीकृत, ग्रामीण बॅंका पिछाडीवर आहेत.

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील बॅंकांनी यंदाच्या खरीप हंगामात आजवर ६८ हजार ५४८ शेतकऱ्यांना ३५० कोटी ६४ लाख ६० हजार रुपयांचे पीक कर्जवाटप केले. उद्दिष्टांपैकी नांदेड जिल्ह्यात १०.०६ टक्के, परभणीत ६.६९ टक्के, हिंगोलीत ५४.६७ टक्के पीक कर्जवाटप झाले. या तीन जिल्ह्यांत जिल्हा बॅंकेने पीक कर्जवाटपात आघाडी घेतली आहे. राष्ट्रीयीकृत, ग्रामीण बॅंका पिछाडीवर आहेत.

नांदेड जिल्ह्यातील बॅंकांना यंदा १ हजार ९६७ कोटी ५१ लाख रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील बॅंकांनी शनिवार (ता. २२) पर्यंत ३७ हजार ९९५ शेतकऱ्यांना १९७ कोटी ९८ लाख रुपये (१०.०६ टक्के) पीककर्ज वाटप केले. सार्वजनिक क्षेत्रातील (राष्ट्रीयीकृत) बॅंकांना १ हजार ३६० कोटी ७ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. त्यांनी ३ हजार ३७९ शेतकऱ्यांना २७ कोटी ५६ लाख रुपये (२.०३ टक्के) वाटप केले.

खासगी बॅंकांनी १५१ कोटी ६७ लाख रुपये उद्दिष्टापैकी ८८६ शेतकऱ्यांना २० कोटी ७२ लाख रुपये वाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने २७७ कोटी १७ लाख रुपयांपैकी २ हजार ८४७ शेतकऱ्यांना २२ कोटी ४७ लाख रुपये (८.११ टक्के) पीक कर्जवाटप केले. जिल्हा बॅंकेने १७८ कोटी ६० लाखांपैकी ३० हजार ८८३ शेतकऱ्यांना १२७ कोटी २३ लाख रुपये (७१.२४ टक्के) वाटप केले. 

परभणी जिल्ह्यात या वर्षी १ हजार ४७० कोटी ४४ लाख २३ हजार रुपये उद्दिष्ट आहे. सोमवार (ता. २४)पर्यंत १७ हजार ८२६ शेतकऱ्यांना ९८ कोटी ४२ लाख रुपये (६.६९ टक्के) पीककर्जाचे वाटप केले. व्यापारी बॅंकांनी १ हजार ५२ कोटी ३६ लाखांपैकी ३ हजार ४५९ शेतकऱ्यांना ३७ कोटी ८१ लाख रुपये (३. ५९ टक्के), खासगी बॅंकांनी ५२ कोटी ४७ लाखांपैकी १ हजार ५६ शेतकऱ्यांना ९ कोटी ९५ लाख (१८.९६ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने २०० कोटी १४ लाख रुपयांपैकी १ हजार ९५ शेतकऱ्यांना ९ कोटी ४१ लाख रुपये (४.७० टक्के) कर्जवाटप केले. जिल्हा बॅंकेने १६५ कोटी ४७ लाखांपैकी १२ हजार २१६ शेतकऱ्यांना ४१ कोटी २५ लाख रुपये (२४.९३ टक्के) वाटप केले.

हिंगोलीतील बॅंकांनी १ हजार १६१ कोटी ९७ लाखांपैकी १२ हजार ७२७  शेतकऱ्यांना ५४ कोटी २४ लाख ६० हजार रुपयांचे (४.६७ टक्के) वाटप केले. व्यापारी बॅंकांनी ८५३ कोटी ९६ लाखांपैकी १ हजार ७१२ शेतकऱ्यांना १८ कोटी ३७ लाख २२ हजार रुपये (२.१५ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने १६० कोटींपैकी ७६० शेतकऱ्यांना ६ कोटी २६ लाख ५० हजार रुपये पीक कर्जवाटप केले.

जिल्हानिहाय पीक कर्जवाटप स्थिती (कोटी रुपये)

जिल्हा  शेतकरी 
संख्या 
 पीककर्ज 
रक्कम
टक्केवारी
नांदेड  ३७९९५ १९७.९८ १०.०६
परभणी  १७८२६ ९८.४२ ६.६९
हिंगोली १२७२७ ५४.२४६० ४.६७

 

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...