पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख हेक्टरची नोंद

पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख हेक्टरची नोंद
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख हेक्टरची नोंद

पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू खरीप हंगामात आतापर्यंत राज्यात तीन लाख ४४ हजार हेक्टरवरील पिकाचा विमा उतरविण्यात आला आहे. यात शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी २९ कोटी रुपये भरले आहेत. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना यंदा विमा हप्ता भरण्यासाठी २४ जुलै ही शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे.  केंद्र शासनाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण २५० कोटी ५० लाख रुपयांचा हप्ता गोळा झाला आहे. त्यात राज्याचा हिस्सा ११० कोटी ५१ लाख रुपयांचा आहे. देशात गेल्या खरिपात शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून दोन हजार २३४ कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला होता. मात्र, केंद्र व राज्यांनी एकत्रितपणे १५ हजार १५३ कोटी रुपये एकूण हप्ता अनुदान मिळून एकूण १७ विमा कंपन्यांना दिले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी गेल्या हंगामात ५६.१५ लाख हेक्टरवरील पिकाचा विमा उतरविला होता. त्यापोटी शेतकऱ्यांनी ४९९ कोटी रुपये विमा कंपन्यांना दिले. तसेच हप्त्याच्या उर्वरित अनुदानापोटी राज्याच्या तिजोरीतून १८३० कोटी रुपये दिले गेले. कंपन्यांना गेल्या हंगामात चार हजार १५९ कोटी रुपये विमा हप्त्यापोटी मिळाले.  विमा हप्त्यापोटी मिळालेली ८५ टक्के रक्कम कंपन्यांनी पुन्हा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून वाटली आहे. म्हणजेच कंपन्यांना १५ टक्के नफा गेल्या हंगामात झाल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  पीकविमा दृष्टिक्षेपात

  • देशात तीन कोटी ६७ लाख शेतकऱ्यांनी उतरविला विमा
  • देशात २५० कोटी ५० लाख रुपयांचा हप्ता गोळा
  • राज्यांचा हिस्सा ११० कोटी ५१ लाख रुपये
  • गेल्या खरिपात शेतकऱ्यांनी २,२३४ कोटींचा हप्ता भरला
  • गेल्या खरिपात केंद्र, राज्यांकडून १५,१५३ कोटी हप्ता अनुदान.
  • गेल्या खरिपात राज्यातील शेतकऱ्यांनी ४९९ कोटींचा हप्ता दिला
  • राज्य सरकारने १८३० कोटींचे हप्ता अनुदान दिले
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com