agriculture news in Marathi 35 patient of makadtap in Sindhugurg Maharashtra | Agrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडतापाचे  ३५ रूग्ण, तर चौघांचा मृत्यू

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 एप्रिल 2020

जिल्ह्यात माकडतापाचे ३५ रूग्ण सापडले असून त्यापैकी ४ चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे माकडताप अशा दोन संकटातून आरोग्य विभाग काम करीत आहे.

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात माकडतापाचे ३५ रूग्ण सापडले असून त्यापैकी ४ चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे माकडताप अशा दोन संकटातून आरोग्य विभाग काम करीत आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत सात लाख लोकांचा सर्व्हे केला असल्याची माहीती आरोग्य समिती सभेत देण्यात आली.

जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला उन्नती धुरी, राजेश कविटकर, हरी खोबरेकर आदी उपस्थित होते.

आरोग्य सभेत कोरोनाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ६ लाख ८७ हजार ६७९ च्यक्तींचा सर्व्हे करण्यात आला. यातील ३ हजार ७२९ लोकांना सर्दी, खोकला होता. परंतु त्या सर्वांची प्रकृती चांगली आहे, अशी माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली. एकीकडे कोरोनाचे संकट आहे तर दुसरीकडे जिल्ह्यात माकडतापाचे संकट देखील अधिक गडद होत आहे.

जिल्ह्यात माकडतापाचे ३५ रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. यातील तिघांचा गोवा बांबुळी रूग्णालयात तर एकाचा जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. या दोन्ही सकंटाचा सामना करताना आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत असल्याचे सभेत सांगण्यात आले. या सभेत जिल्ह्यातील कोरोनाविषयीच्या उपाययोजनांची माहीती देखील देण्यात आली.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...