द्राक्ष वाइन उत्पादनात ३५ टक्के घट शक्य 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाइन उत्पादकांनी गतवर्षीच्या हंगामात कराराप्रमाणे अडचणीतही वाइन द्राक्ष वाणांवर प्रक्रिया केली.
wine grapes
wine grapes

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाइन उत्पादकांनी गतवर्षीच्या हंगामात कराराप्रमाणे अडचणीतही वाइन द्राक्ष वाणांवर प्रक्रिया केली. मात्र टाळेबंदी झाल्याने वाइन विक्री सहा महिने बंद होती. त्यामुळे मागील वर्षीचा अतिरिक्त साठा शिल्लक असल्याने यंदाच्या हंगामात उत्पादित वाइनचा साठा करण्यासाठी टाक्या शिल्लक नाहीत. परिणामी यंदा द्राक्ष वाइन उत्पादनात ३५ टक्के होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे तयार द्राक्षांचे नुकसान झाल्याने वाइनऱ्यांनी हा माल प्रक्रियेसाठी खरेदी करून शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा दिला. पुढे कोरोनाचे संकट डोक्यावर असताना वाइनऱ्यांनी शेतकऱ्यांशी केलेल्या कराराप्रमाणे द्राक्ष वाणांचा खुडा करून प्रक्रियाही केली. मात्र पुढे टाळेबंदी झाल्याने वाइन उत्पादनपश्चात विक्री अडचणीत सापडली. त्यामुळे वाइनचा साठा टाक्यांमध्ये शिल्लक आहे. मागणी नसल्याने हा साठा बाटलीबंद झालेला नाही.

एकट्या नाशिक जिल्ह्यात २३०० हेक्टर क्षेत्रावर शेनीन ब्लॉनक, झिफेंडल ब्लॉनक, सोव्हिएन ब्लॅक, शिराझ, कॅबर्नेट या प्रमुख वाइन वाणांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. दरवर्षी नाशिक, पुणे, सोलापूर व सांगली जिल्ह्यात २५ हजार टन द्राक्षावर प्रक्रिया होते. मात्र यंदा ८ ते १० हजार टन द्राक्षांवरही प्रक्रिया होणार नसल्याची माहिती वाइन उत्पादकांनी दिली. त्यामुळे त्याचा फटका करार न केलेल्या शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. तर करार केलेल्या शेतकऱ्यांनाही वेळेवर परतावा मिळणार का? हा मोठा प्रश्‍न आहे.  वाइन उद्योगापुढील समस्या

  • मागील वर्षी पूर्ण क्षमतेने वाइन उत्पादन
  • मागणी मात्र अडचणीत
  • मार्च ते सप्टेंबरदरम्यान वाइन विक्री ठप्प
  • वाइनचा मोठा साठा शिल्लक 
  • पुरवठ्याच्या तुलनेत मागणी कमीच 
  • वाइन उद्योगाला राजाश्रयाची गरज  राज्यातील वाइन उद्योग गेल्या २० वर्षांत वाटचाल करीत १ हजार कोटींवर गेला आहे. त्यामुळे मिशन तयार करून ५ हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राजाश्रय मिळाला तरच वाइन द्राक्ष उत्पादक व वायनरी उद्योग तग धरू शकेल. त्यामुळे या उद्योगाला राजाश्रय द्यावा, अशी मागणी होत आहे.  प्रतिक्रिया ज्या वाइनऱ्यांनी शेतकऱ्यांशी अधिकृतरीत्या करार केलेले आहेत त्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. वाइन प्रक्रियेसाठी ज्या जातीच्या लागवडी केल्या आहेत. त्या क्षेत्रावरील मालावर प्राधान्याने प्रक्रिया करणार आहे. कराराशिवाय इतर वाइन द्राक्ष बागांमधील प्रक्रिया करू, मात्र अगोदर प्राधान्याने करार पाळले जातील. - जगदीश होळकर, अध्यक्ष, अखिल भारतीय द्राक्ष वाइन उत्पादक संघ वाइन उत्पादन केल्यानंतर साठवणूक क्षमता नसल्याने अडचणी आहेत. त्यामुळे चालू वर्षी उत्पादन घटून फटका बसणार आहे. त्यामुळे खर्च करून करार केल्याप्रमाणे प्रक्रिया करता यावी. यासाठी साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. -शिवाजीराव आहेर, वाइन उत्पादक, ओझर मिग, जि. नाशिक.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com