लघू अन्नप्रक्रिया समूहांसाठी ३५ हजार कोटींची गुंतवणूक

देशाच्या ग्रामीण भागाच्या विकासात स्थानिक अन्नप्रक्रिया व्यवसायाचा वाटा महत्त्वाचा आहे. गावपातळीवरील होणाऱ्या या व्यवसायाचे महत्त्व सर्वप्रथम पंतप्रधानांनी अधोरेखित केले होते. अन्नप्रक्रिया उद्योगाची क्षमता मोठी असूनही मूल्य साखळीतील त्याचा वाटा सध्या कमी आहे. - हरसिमरत कौर बादल, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री
harsimrat kaur badal
harsimrat kaur badal

पुणे : देशातील लघू अन्नप्रक्रिया समूहांसाठी (क्लस्टर)विशेष योजना सोमवारी (ता. २९) जाहीर केली. या योजनेत २०२५ पर्यंत अन्नप्रक्रिया उद्योगात ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, दहा हजार कोटींचा खर्च निर्धारित करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून ९ लाख नवे रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे. कोविड-१९ संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियान घोषित करून त्यासाठी २० लाख कोटींची तरतूद केली होती. आत्मनिर्भर अभियानात या योजनेचादेखील समावेश होता. त्यानुसार आता १० हजार कोटींची योजना घोषित करण्यात आली. कृषी प्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांनी ऑनलाइन पद्धतीने या योजनेचा शुभारंभ केला. ‘‘देश आत्मनिर्भर होण्यासाठी अभियानातील ही योजना ऐतिहासिक स्वरूपाची ठरेल, यामुळे देशाच्या अन्नप्रक्रिया क्षेत्रातील लघू उद्योगांतील आठ लाख समूहांना माहिती, प्रशिक्षण, तसेच आर्थिक, तांत्रिक व व्यावसायिक पाठबळ मिळणार आहे,’’ असे मंत्री कौर यांनी स्पष्ट केले. २०२५ पर्यंत चालू राहणाऱ्या या योजनेत १० हजार कोटींची प्राथमिक तरतूद करण्यात आली आहे. योजनेत होणाऱ्या खर्चात ६० टक्के वाटा केंद्र आणि ४० टक्के वाटा राज्याचा असेल. लघू अन्नप्रक्रिया समूहांसाठीच्या या योजनेत प्रत्येक जिल्ह्यात एक उत्पादन केंद्रित केले जाईल. ते उत्पादन निश्चित करण्याचा अधिकार राज्याला देण्यात आला आहे. या योजनेतून ४० हजार स्वयंसहायता गटांना खेळते भांडवल, तसेच छोटी अवजारे पुरवली जाणार आहेत. देशात सध्या अन्नप्रक्रिया क्षेत्रातील २५ लाख समूहांकडून या क्षेत्रात ७४ टक्के रोजगार निर्माण होतो, त्यातील ६६ टक्के समूह हे स्थानिक आणि ग्रामीण भागात आहेत. त्यात पुन्हा यातील ८० टक्के समूह हे कुटुंबकेंद्रित आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील स्थलांतर रोखण्यास मदत होते आहे. दरम्यान, केंद्राने ‘ऑपरेशन ग्रीन’ योजनेला आता मुदतवाढ देत नव्या फळपिकांचादेखील समावेश केला आहे. अन्नप्रक्रिया मंत्रालय आता अनुसूचित जाती व जमातीतून नवउद्योजक तयार करण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू करणार आहे. या योजनेतून ४१ प्रकारच्या कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार आहे. अशी आहे योजना

  • संभाव्य गुंतवणूक ३५ हजार कोटी
  • रोजगारनिर्मिती ः ९ लाख
  • सरकारने केलेली आर्थिक तरतूद ः १० हजार कोटी रुपये
  • योजनेचा कालावधी ः २०२० ते २०२५
  • प्रक्रियेसाठी एक जिल्हा एक उत्पादन संकल्पना
  • नाशवंत शेतमाल (फळे, भाजीपाला), कडधान्य तसेच अन्नधान्य आधारित उत्पादनांचा समावेश
  • सूक्ष्म प्रक्रिया युनिटला ३५ 
  • टक्क्यांपर्यंत १० लाख रुपयांच्या मर्यादेत अर्थसाह्य
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com