agriculture news in Marathi 3.5 thousand crore turnover from e-Nam Maharashtra | Agrowon

राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे साडेतीन हजार कोटींची उलाढाल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय ऑनलाइन कृषी व्यापाराला (ई -नाम) चालना मिळत आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यातील ६० बाजार समित्यांद्वारे तीन वर्षांत ऑनलाइन खरेदी-विक्रीमध्ये साडेतीन हजार कोटींची उलाढाल झाली आहे. 

पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय ऑनलाइन कृषी व्यापाराला (ई -नाम) चालना मिळत आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यातील ६० बाजार समित्यांद्वारे तीन वर्षांत ऑनलाइन खरेदी-विक्रीमध्ये साडेतीन हजार कोटींची उलाढाल झाली आहे. तर कोरोना संकटात मार्च ते ऑगस्ट २०२० या कालावधीत सुमारे २७५ कोटींची उलाढाल झाली. तसेच दुसऱ्या टप्प्यातील समाविष्ट झालेल्या ५८ बाजार समित्यांचे कामकाज जुलैमध्ये सुरु झाले असून, सुमारे ७ कोटींची उलाढाल झाल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

श्री. पवार म्हणाले, ‘‘केंद्र शासनाच्या ‘ई-नाम’ योजनेमध्ये राज्यातील दोन टप्प्यांमध्ये ११८ बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक बाजार समितीला ३० लाखांचा निधी देण्यात आला असून, पहिल्या टप्प्यातील बाजार समित्यांचे कामकाज सुरळीत सुरु आहे.

पहिल्या टप्प्‍यातील ६० बाजार समित्यांमध्ये सप्टेंबर २०१७ ते ३१ ऑगस्ट २०२० अखेर सुमारे साडेतीन हजार कोटींची उलाढाल झाली आहे. ‘ई-नाम’ राबविताना शेतमालाचा दर्जा तपासणीसाठी प्रयोगशाळा देखील उभारण्यात आल्या असून, या प्रयोगशाळांमधून शेतमालाच्या दर्जाबाबतचे प्रमाणपत्र ऑनलाइन लिलावासोबत खरेदीदाराला देण्यात येते. यामुळे शेतमालाला अधिकचा दर मिळणे शक्य होत आहे.’’ 

‘‘दुसऱ्या टप्प्प्यातील ५८ बाजार समित्यांचे कामकाज नुकतेच सुरु झाले असून, जुलै ते ऑगस्ट २०२० अखेर ७ कोटी २१ लाखांची उलाढाल झाली आहे. यासाठी या बाजार समित्यांचे सचिव, पदाधिकारी कर्मचारी व्यापारी आडते शेतकरी यांना दोनदा ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले आहे,’’ असेही पवार यांनी सांगितले.

दृष्टीक्षेपात ‘ई-नाम’ आणि बाजार समित्या 

 •   पहिल्या टप्पातील ६० बाजार समित्यांद्वारे एकूण १ कोटी १६ लाख क्विंटल शेतमालाची खरेदी-विक्री 
 •   ४ लाख ९९ हजार असेईंग (तपासणी) लॉट्सची निर्मिती 
 •   ११ लाख ८४ हजार शेतकरी संलग्न 
 •   १५ हजार अडत्यांकडून ‘ई-नाम’चा वापर 
 •   २४७ शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग 
 •   प्रती लॉट बोलण्याचे सरासरी प्रमाण ६.१७

२० मार्च ते ३१ ऑगस्टदरम्यानची स्थिती 

 • ९ लाख ६९ हजार क्विंटल शेतमालाच्या विक्रीतून २७५ कोटींची उलाढाल 
 • ५७ हजार २१५ लॉट्सचे असेईंग (तपासणी) 
 • प्रती लॉट बोलण्याचे सरासरी प्रमाण ५.४६

दुसऱ्या टप्प्यातील बाजार समित्यांचे कामकाज 

 • २२ हजार ८६० क्विंटल शेतमालाची खरेदी-विक्री
 • ७ कोटी २१ लाखांची उलाढाल 
 • १९७ लॉट्सचे असेईंग

इतर अॅग्रो विशेष
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...