agriculture news in Marathi, 35 thousand crore turnover of state cooperative bank, Maharashtra | Agrowon

राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढाल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

मुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी उच्चांकी उलाढाल करणाऱ्या राज्य सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंगळवारी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बँकेच्या नावातील बदलासह भागधारकांना सलग सहाव्यांदा दहा टक्के लाभांश देण्याच्या निर्णयाला सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या मुख्य कार्यालयात पार पडली. 

मुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी उच्चांकी उलाढाल करणाऱ्या राज्य सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंगळवारी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बँकेच्या नावातील बदलासह भागधारकांना सलग सहाव्यांदा दहा टक्के लाभांश देण्याच्या निर्णयाला सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या मुख्य कार्यालयात पार पडली. 

या वेळी २०१८–१९ या आर्थिक वर्षात बँकेने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी वार्षिक सभेपुढे मांडला. ते म्हणाले, की बँकेस गेल्या वर्षीप्रमाणे ‘अ’ ऑडिट वर्ग मिळाला आहे. अहवाल वर्षात इतिहासात बँकेने प्रथमच एकूण ३५,४४० कोटी इतकी उच्चांकी उलाढाल केली आहे. तसेच रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ९ टक्के भांडवल पर्याप्तता प्रमाण राखणे आवश्यक असताना, राज्य बँकेने मार्च २०१९ अखेर १५.६० टक्के इतके भांडवल पर्याप्तता प्रमाण राखले आहे. 

अहवाल वर्षअखेर बँकेचे नक्त मूल्य (नेटवर्थ) २६८२ कोटी इतके असून, बँकेचा स्वनिधी ४०३१ कोटी झाला आहे. अहवाल वर्षात बँकेला ५६४ कोटींचा ढोबळ नफा, तर तरतुदीनंतर २५१ कोटीचा निव्वळ नफा झाला आहे. २०१८ -१९ या आर्थिक वर्षात बँकेच्या आर्थिक परिस्थितीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे सर्व सभासदांना सलग सहाव्यांदा १० टक्के इतका लाभांश जाहीर केला. राज्य बँकेने राज्यातील सर्व सहकारी संस्थांचे पालकत्व स्वीकारले आहे.

राज्याची ही शिखर बँक असूनही, ‘शिखर’ या शब्दाचा समावेश नव्हता. त्यामुळे उपविधीमध्ये बदल सुचवून बँकेचे नाव दि महाराष्ट्र स्टेट को–ऑपरेटिव्ह अॅपेक्स बँक लि., म्हणजेच दि महाराष्ट्र राज्य सहकारी ‘शिखर’ बँक लि., करण्याच्या शिफारशीस सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. सभासद व व्यवस्थापन यांचेमध्ये काही कलह निर्माण झाल्यास, त्यांनी न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्यापूर्वी बँक व कर्जदार यामध्ये तडजोडीचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याने राज्य बँकेने ‘तडजोड मंडळाची निर्मिती’ करण्याच्या शिफारशींना एकमताने मंजुरी दिली.

बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला बँकेच्या प्रशासक मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख, वैधानिक लेखापरीक्षक डी. ए. चौगुले अॅण्ड असोसिएट्‍स यांचे प्रतिनिधी तसेच बँकेचे सभासद प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

इतर बातम्या
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...