भंडारा जिल्ह्यात ३५ हजार शेतकरी कर्जमुक्‍त

भंडारा जिल्ह्यात ३५ हजार शेतकरी कर्जमुक्‍त
भंडारा जिल्ह्यात ३५ हजार शेतकरी कर्जमुक्‍त

भंडारा ः राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करून त्याची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली. भंडारा जिल्ह्यातील सिल्ली व शहापूर येथे प्रायोगिक तत्त्वावर कर्जमुक्तीचे आधार प्रमाणिकरण सुरू झाले असून या दोन्ही ठिकाणी २४०  सभासद आहेत. आज कर्जमुक्तीचे आधार प्रमाणिकरण पावती वितरित करून योजनेचा प्रारंभ झाला. उर्वरित सभासदांची यादी २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाईल.  जिल्ह्यात ३५ हजार ३२५ लाभार्थी कर्जमुक्तीसाठी पात्र आहेत. ग्रामपंचायत कार्यालय येथील आपले सरकार सेवा केंद्र, शहापूर येथे जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, भंडारा जिल्हा सहकारी सरव्यवस्थापक संजय बरडे व सहायक उपनिबंधक विलास देशपांडे  यांनी सभासदांना कर्जमुक्ती योजनेची आधार प्रमाणिकरण पावती वितरित केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com