agriculture news in Marathi, 35 thousand hector pomegranate horticulture dry due to drought, Maharashtra | Agrowon

राज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा वाळल्या
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जुलै 2019

डाळिंब उत्पादक शेतकरी दुष्काळामुळे आर्थिक संकटात आला आहे. डाळिंब उत्पादकांनी फार मोठ्या प्रमाणात देशाला परकीय चलन मिळवून दिले आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाने संकटात मदत केली पाहिजे.
- अंकुश पडवळे, अध्यक्ष, महा ऑरगॅनिक ॲन्ड रेश्युड्यु फ्री फार्मस असोसिएशन

सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे राज्यातीतल ३५ हजार हेक्टरहून अधिक डाळिंबाच्या बागांचे वाळून सरपण झाले. परंतु, या वाळलेल्या बागांची माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नाही आणि या बागांचे अद्यापही पंचनामे झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे पंचनामे कधी होणार आणि नुकसानभरपाई कधी मिळणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. 

राज्यात सुमारे १ लाख ७५ हजार हेक्टरवर डाळिंबाची लागवड आहे. गेल्यावर्षी भयंकर दुष्काळात वाढती उष्णता आणि पाणीटंचाईमुळे राज्यातील ३५ हजार हेक्टरहून अधिक डाळिंबाच्या बागांचे सरपण झाले. परंतु, गेल्या वर्षभरापासून बाधित झालेल्या डाळिंबाचे पंचनामे झाले नाहीत. 

कृषी विभागाच्या हालगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे मुश्कील झाले आहे. त्यात यंदाही दुष्काळाचे सावट आहे. अशा दुहेरी संकटात डाळिंब उत्पादक शेतकरी सापडला आहे. यंदाही डाळिंबाचा बहार धरता आला नाही. आजमितीस बागांना टॅंकरने पाणी देणे सुरू आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. परिणामी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. 

शेतकऱ्यांच्या मागण्या

  • सुकलेल्या व वाळलेल्या बागांचे तातडीने पंचनामे करावेत. ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या बागांना पाण्यासाठी व मल्चिंग करण्यासाठी एन. एच. एम.मधून तत्काळ अनुदान द्यावे.  
  • बागा वाळलेल्या शेतकऱ्यांना पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेतून नवीन लागवड योजनेत समाविष्ट करावे.
  • पाऊस नसल्याने बागा बाधित झाल्या आहेत. परंतु, या बागांचे पंचनामे होणे गरजेचे आहे. पंचनामे करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय आणि तलाठी यांनी केले पाहिजेत. 
    - किरण जाधव, शास्त्रज्ञ (उद्यान विद्या), कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ

प्रतिक्रिया

पाण्याअभावी २५ टक्के बागा वाळून गेल्या आहेत. त्याचे पंचनामे अद्यापही केले नाहीत. सध्या मृग बहार धरला आहे. पहिल्या पावसावर कळी आली आहे. पण आत्ता बागेला द्यायला पाणी नाही. त्यामुळे मोठे संकट आले आहे.
- शकील काझी, डाळिंब उत्पादक, भाळवणी, जि. सोलापूर

पाऊस नसल्याने बागा बाधित झाल्या आहेत. परंतु, या बागांचे पंचनामे होणे गरजेचे आहे. पंचनामे करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय आणि तलाठी यांनी केले पाहिजेत. 
- किरण जाधव, शास्त्रज्ञ (उद्यान विद्या), कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ

इतर अॅग्रो विशेष
विषबाधेबाबत गांभीर्य कधी?घटना क्रमांक १ ः तारीख - ४ मे २०१९, ठिकाण -...
समवर्ती लेखापरीक्षणातूनच टळतील...इ.स. पूर्व सहाव्या शतकापूर्वी प्राचीन इजिप्शियन...
सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू...जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार देशमुखांकडून...नांदेड जिल्ह्यातील पारडी (ता. अर्धापूर) येथील...
आदिवासीबहुल भागात ‘निसर्गराज’ची घौडदौड धुळे जिल्ह्यातील हारपाडा (ता. साक्री) या...
बचत गटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वरमुंबई  : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ...
वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२...नगर : पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात...
अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे...मुंबई  : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
अतिवृष्टी, पुराचा चार लाख हेक्टरवरील...पुणे  : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे...
अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यातसिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता...
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या...पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने...
‘ती’च्या शिक्षणाची कथाशा ळा-महाविद्यालयांचे निकाल असो  विविध...
संथ वाहते कृष्णामाई...संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख-दुःखाची,...
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...