agriculture news in Marathi 350 crore FRP pending Maharashtra | Agrowon

पहिल्याच टप्प्यात थकवली ३५० कोटींची ‘एफआरपी’

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

 राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर पहिल्या ३० दिवसांत साखर कारखान्यांनी ३५० कोटी रुपये ‘एफआरपी’ थकवली आहे. 

पुणे : राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर पहिल्या ३० दिवसांत साखर कारखान्यांनी ३५० कोटी रुपये ‘एफआरपी’ थकवली आहे. विशेष म्हणजे अडचणींवर मात करीत जवाहर सहकारी साखर कारखान्याने पूर्ण एफआरपी देत शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. 

राज्यात यंदा जादा ऊस असल्यामुळे १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्यास साखर आयुक्तांनी मान्यता दिली होती. तथापि, बेमोसमी पावसामुळे बहुतेक साखर कारखान्याचे ऊसतोड नियोजन चुकले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात कमी कारखाने सुरू होऊ शकले. त्यात देखील हाती पुरेसे खेळते भांडवल नसल्याने बहुतेक कारखान्यांना कायद्यानुसार दोन आठवड्यांत एफआरपी देता आलेली नाही. 

साखर आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, १५ नोव्हेंबरपर्यंत ४८ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून १६०.७६ लाख टनांपेक्षा जास्त ऊस खरेदी केला. त्यापोटी ३६६.२४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणे अपेक्षित होते.  

तथापि, कारखान्यांनी केवळ चार टक्के म्हणजेच १४ कोटी ७० लाख रुपये जमा केले. ४७ कारखान्यांनी शेतकऱ्यांचे जवळपास ३५१ कोटी ५४ लाख रुपये थकवल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला खरेदी केलेल्या उसाची १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना देण्यात ‘जवाहर’ कारखान्याने बाजी मारली आहे. १२ हजार टनांची प्रतिदिन गाळपक्षमता असलेल्या जवाहरने ९९०३ टन ऊस ३४३७ रुपये टनांनी खरेदी केला.

‘जवाहर’चा उतारा १२.०६ टक्के आला आहे. ६३७.५५ रुपये प्रतिटन ऊसतोडणी व वाहतूक खर्च वजा करून २७९९.५५ रुपये टनाप्रमाणे ‘जवाहर’ने दोन कोटी ७७ लाख रुपये शेतकऱ्यांना वाटले आहेत. याशिवाय इंदापूरच्या ‘कर्मयोगी’ने देय एफआरपीतील १२.७२ कोटीपैकी १५ नोव्हेंबरपर्यंत ११.९३ कोटी रुपये वाटले आहेत. ‘कर्मयोगी’ने ५९ हजार ६४० टन ऊस खरेदी केला असून, उतारा ९.८१ टक्के येतो आहे. या कारखान्याने ६६१.४४ रुपये तोडणी-वाहतूक खर्च कापून २१३४.४१ रुपये प्रतिटन निव्वळ एफआरपी काढली आहे. 

प्रतिक्रिया
आर्थिक अडचण असतानाही बहुतेक कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. सरकारी पातळीवरील मदत व अनुदान वेळोवेळी मिळणे गरजेचे आहे. तसेच राज्य सहकारी बॅंकेने साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या उचलीवर केलेली कपात तत्काळ मागे घेतली पाहिजे. यामुळे एफआरपी देण्यात अडचणी येत आहेत.
— आबासाहेब मोहनराव पाटील, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघ


इतर बातम्या
कृषी कायद्यांना एकसंध विरोध; मुंबईत...मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा,...
नगरमध्ये पन्नास हजार क्विंटल मका खरेदी...नगर ः शासनाने बंद केलेली मका खरेदी सुरू केली. नगर...
सांगली बाजार समितीत नव्या हळदीचे सौदेसांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे विभागात गहू क्षेत्रात ३६ हजार...पुणे ः गहू पेरणीस पोषक हवामान उशिराने तयार झाले....
संघटित कुक्कुटपालनातून ‘बर्ड फ्लू’चा...नाशिक : विभागात संघटित व शास्त्रीय पद्धतीने...
अण्णांच्या शेतकरी आंदोलनाला चार...नगर ः पीपल्स हेल्पलाइन, भारतीय जनसंसद व ‘मेरे देश...
महाराष्ट्राच्या चित्ररथावर संत...राळेगणसिद्धी, जि. नगर : प्रजासत्ताकदिनी (ता. २६)...
मराठवाड्यातील उपयुक्‍त पाण्यात दोन...औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण प्रकल्पांमधील...
जालना जिल्ह्यातील दोन केंद्रांत अडीच...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजारसमिती व उपबाजार...
पाणीपुरवठ्यापासून एकही गाव वंचित...परभणी ः  ‘‘‘हर घर नल से जल’ योजनेअंतर्गत...
लिंबूवर्गीय फळांच्या आयातीवरील बंधने...२०२१ च्या सुरवातीस ब्रिटनने युरोपीय संघाच्या एकल...
पीकविमा सरसकट द्या; ‘प्रहार जनशक्ती’ची...नांदेड : पीकविमा मंजूर व्हावा म्हणून यापूर्वी...
मनमाडमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर...नाशिक : मनमाड येथे किसान सभेच्या वतीने ...
नगर जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास...नगर :  नगर जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंकेची...
समन्यायी पाणी वाटप आव्हानात्मक विषय : ...नांदेड : समन्यायी पाणी वाटप हा दिवसेंदिवस अत्यंत...
`मका खरेदीची प्रक्रिया शुक्रवारपर्यंत...नाशिक: ‘‘मका खरेदीसाठी शासनाने ३२ जानेवारी पर्यंत...
तीन हजार महिलांना देणार रोजगार : विजय...चंद्रपूर : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला...
पत्र्या ठोकण्याची वेळ आणू नका : राजू...सांगली : केंद्र सरकार कृषी कायदे शेतकऱ्यांवर...
मका खरेदीचे कमी उद्दिष्ट, शेतकऱ्यांसमोर...बुलडाणा : मका खरेदीसाठी शासनाने नवे उद्दिष्ट देऊन...
मागील वर्ष ठरले आजवरचे सर्वाधिक उष्णपुणे : कोरोनाचे संकट, बर्ड फ्लूची साथ आणि शेतकरी...