वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी ३५० कोटी

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी ३५० कोटी
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी ३५० कोटी

यवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ३५० कोटी रुपाचीं तरतुद करण्यात आली. निधी मिळाल्याने रेल्वे प्रकल्पाचे कामाला आणखी गती मिळण्याची शक्‍यता आहे. वर्धा ते यवतमाळ दरम्यान मातीकामाला सुरवात झाली असून प्रमुख पुलांची कामेही सुरू आहे. 

जिल्ह्याच्या विकासात वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. शेतकरी, व्यापारी, लहान-मोठ्या व्यावसायिकांसोबतच जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. जिल्ह्यात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात असून उद्योगांसाठी वातावरण अनुकूल आहे. त्यात रेल्वे मार्गावर जिल्हा आल्यास आणखी भर पडणार आहे. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेमार्गाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. 

निवडणूक, लोकसभा, विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आले की वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचा मुद्दा समोर येतो. गेल्या काही वर्षांत रेल्वेला मिळालेल्या निधीमुळे रेल्वेचे काम रुळावर आले आहे. प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेली जमिन जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत अधिग्रहीत करून दिली. काही प्रकरणे वगळता जवळपास सर्वांना रक्कम अदा करण्यात आली. प्रकल्पासाठी एक हजार १४४ हेक्‍टर ८५ आर. जमिन आवश्‍यक होती. ती जवळपास पूर्ण झाली आहे. 

जमिन हस्तांतरणानंतर माती काम, महत्त्वपूर्ण पुलांच्या कामांना गती आली आहे. वर्धा ते यवतमाळ दरम्यान जवळपास ७० टक्के मातीकाम पूर्ण झाले. या शिवाय महत्त्वपूर्ण पुलांची कामे झाली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात यंदा वर्धा-यवतमाळ-नांदेड या २७० किलोमीटरच्या रेल्वेमार्गासाठी ३५० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. सध्याच्या कामांची गती पाहता मार्चपर्यंत यवतमाळ पर्यंत मातीकाम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर एप्रिलच्या सुरूवातीलाच रेल्वे रुळांचे काम सुरू होणार आहे. परिणामी, लवकरच जिल्ह्यातील नागरिकांचे स्वप्न साकार होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com