Agriculture news in Marathi 350 posts vacant in health department in Pune district | Page 2 ||| Agrowon

पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागात ३५० पदे रिक्त

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 मार्च 2020

पुणे ः सध्या ‘कोरोना विषाणू’च्या प्रादुर्भावाने चांगलेच थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर शासकीय आरोग्य विभागात आरोग्य सेवकांसह आरोग्य सहायक, औषधनिर्माण अधिकारी अशा विविध पदांची गरज आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रिक्त झालेल्या पदावर नवीन भरती प्रक्रिया न केल्यामुळे जिल्ह्यात सुमारे ३५० पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे ः सध्या ‘कोरोना विषाणू’च्या प्रादुर्भावाने चांगलेच थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर शासकीय आरोग्य विभागात आरोग्य सेवकांसह आरोग्य सहायक, औषधनिर्माण अधिकारी अशा विविध पदांची गरज आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रिक्त झालेल्या पदावर नवीन भरती प्रक्रिया न केल्यामुळे जिल्ह्यात सुमारे ३५० पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी भागातील ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्र व उपक्रेंद्राच्या अनेक ठिकाणी पदे रिक्त झालेली आहेत. याशिवाय, इमारतीची दुरवस्था झाली असल्याने काही ठिकाणी विविध सुविधांचा अभाव असल्याचे समोर आले आहे. मात्र, प्रत्येक ठिकाणी विविध पदांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे विविध अडचणींचा सामान करावा लागत आहे. राज्य सरकारकडून भरती प्रक्रिया होत नसल्याने अनेक ठिकाणी आरोग्य केंद्रात या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सध्या जिल्ह्यातील भोर तालुक्यात वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’मध्ये १८७ पदापैकी अवघी एक जागा रिक्त आहे. वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ मधील ३३ पैकी ३३ असून एकही रिक्त नाही. मात्र, आरोग्य सेवक महिला एकूण ६५० जागांपैकी १०४, तर पुरुष सेवकांमध्ये २९० पैकी ८१ अशा एकूण १८५ जागा रिक्त आहेत. त्यामध्ये जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यामध्ये सर्वाधिक जागा रिक्त आहेत. 

आरोग्य सहायक महिलांच्या १०० पदांपैकी १२ व पुरुषांमध्ये १५९ पदांपैकी १२ अशी एकूण २४ पदे रिक्त आहेत. तसेच आरोग्य पर्यवेक्षकांच्या १९ पदांपैकी पाच पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञानाच्या नऊ पदांपैकी तीन पदे रिक्त आहेत. उर्वरित कनिष्ठ सहायक व परिचारकांचीही काही पदे रिक्त असून, एकूण सुमारे ३५० पदे रिक्त असल्याची माहिती जिल्हा आरोग्य कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

तालुकानिहाय रिक्त असलेली पदे
खेड १५, दौंड १८, जुन्नर ३९, भोर १२, हवेली १७, आंबेगाव २७, बारामती १२, शिरूर २५, मावळ १६, मुळशी १४, वेल्हे ५, इंदापूर १७, पुरंदर १९, मुख्यालय २.
 


इतर ताज्या घडामोडी
पतसंस्थांचे कामकाज सुरु ठेवण्याचे आदेशअकोला  ः कोरोना विषाणू संसर्ग...
दिग्रसमध्ये शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला...यवतमाळ  ः कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव...
सांगलीतील द्राक्ष उत्पादकांचा ओढा...सांगली  : द्राक्षांची वाहतूक सुरु झाली असली...
कोल्हापुरातील तपोवन मैदानावर घाऊक सौदे...कोल्हापूर  : येथील बाजार समितीत होणारे सौदे...
आपत्तीतही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘...पुणे  : ‘कोरोना’च्या आपत्तीमध्ये सुरळीत...
कळमना बाजार समितीत व्यवहार ठप्पनागपूर  ः कळमना बाजार समितीत धान्य...
नियंत्रण आंबा फळगळीचेसद्यःस्थितीमध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये...
बागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...तीन वर्षापूर्वी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन...
नगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...
घनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...
अकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...
पंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...
हिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...
नगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...
परभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
जळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव  ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...
कऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला  कऱ्हाड, जि.सातारा  :  कऱ्हाड शहरातील...