जळगावात आले ३५०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल

जळगाव :कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.८) आल्याची २१ क्विंटल आवक झाली. दर ३५०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. आवक जामनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव आदी भागातून होत आहे.
3500 to 5200 per quintal in Jalgaon
3500 to 5200 per quintal in Jalgaon

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.८)  आल्याची २१ क्विंटल आवक झाली. दर ३५०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. आवक जामनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव आदी भागातून होत आहे.

बाजारात मंगळवारी  भेंडीची २३ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर होता. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल २२०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. हिरव्या मिरचीची १८ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल २१०० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. पालकाची दीड क्विंटल आवक झाली. पालकाला प्रतिक्विंटल १४०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची ११ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला प्रतिक्विंटल १८०० ते ३२०० रुपये दर मिळाला. 

बीटची सहा क्विंटल आवक झाली. बीटला प्रतिक्विंटल १६०० ते २२०० रुपये दर होता. काशीफळाची २४ क्विंटल आवक झाली. काशीफळाला प्रतिक्विंटल ७५० ते ११५० रुपये दर मिळाला. मेथीची पाच क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर मिळाला. लहान काटेरी वांग्यांची ११ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल १८००ते २८०० रुपये दर होता. शेवगा शेंगांची तीन क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला.

दोडका १४०० ते २४०० रूपये 

कोबीची १५ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८५०  ते २८५० रुपये, असा होता. दोडक्‍यांची ११ क्विंटल आवक झाली. दोडक्‍याला प्रतिक्विंटल १४००  ते २४०० रुपये दर होता. गिलक्‍यांची नऊ क्विंटल आवक झाली. गिलक्‍यास प्रतिक्विंटल १८०० ते ३००० रुपये दर मिळाला. भोपळ्यांची १२ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते २०० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com