agriculture news in marathi, 35,000 students will cleanliness the Ashadhi Vari | Agrowon

आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार स्वच्छता
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 जून 2019

सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार विद्यार्थी सहभागी होऊन वारी स्वच्छ, स्वस्थ, निर्मल आणि हरित वारी करण्यासाठी परिश्रम घेणार आहेत. वारीच्या पूर्वनियोजनासाठी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील बैठकीत हा निर्णय झाला. 

सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार विद्यार्थी सहभागी होऊन वारी स्वच्छ, स्वस्थ, निर्मल आणि हरित वारी करण्यासाठी परिश्रम घेणार आहेत. वारीच्या पूर्वनियोजनासाठी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील बैठकीत हा निर्णय झाला. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, महाराष्ट्र शासनाच्या समन्वयातून समर्थ भारत अभियानांतर्गत स्वच्छ, निर्मल वारी उपक्रमांतर्गत मंगळवारी (ता.१९) सोलापूर विद्यापीठात बैठक झाली. त्या वेळी या विद्यापीठासह, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथील प्रतिनिधींचा समावेश होता.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. एस. आय. पाटील, कुलसचिव डॉ. विकास घुटे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत कोकरे, क्रीडा संचालक डॉ. एस. के. पवार, वित्त व लेखाधिकारी श्रेणिक शहा, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. वसंत कोरे, पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते. 

आळंदी-देहू ते पंढरपूर या मार्गावर २२ जून ते १५ जुलैदरम्यान पाच विद्यापीठांतील विद्यार्थी स्वच्छता व प्रबोधन करतील. संत तुकाराम  महाराज व संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी सोहळा जिल्ह्यात आल्यानंतर सोलापूर विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील नऊ हजार विद्यार्थी वारकऱ्यांना मदत करतील. पुणे विद्यापीठाच्या मुख्य क्रीडांगणावर २३ जूनला सकाळी ११ वाजता संकल्प सभा होईल. 

पाच विषयांवर 'लक्ष्य`

स्वच्छता, वृक्षलागवड, व्यसनमुक्ती, निर्मलवारीबाबत पथनाट्यातून प्रबोधन, ५० लाख पत्रावळीचे वाटप, त्यापासून कंपोस्ट खत बनवणे, वनविभाग, सामाजिक वनीकरणाच्या सहकार्यातून ३५ हजार वृक्षांची लागवड, दिंडीच्या मुक्कामी ३५ ठिकाणी आरोग्य शिबिरे,  सेवा सहयोग सामाजिक संस्थेतर्फे निर्मल वारीसाठी दररोज १०० स्वंयसेवक.

इतर बातम्या
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...