मराठवाड्यात ४२ टक्के गावांची पैसेवारी कमी

मराठवाड्यात ४२ टक्के गावांची पैसेवारी कमी
मराठवाड्यात ४२ टक्के गावांची पैसेवारी कमी

औरंगाबाद : मराठवाड्यातील साडेतीन हजारांवर (४२ टक्के) गावातील खरिपाची अंतिम पैसेवारी ५० पैशाच्या आत आली आहे. यामध्ये औरंगाबाद व परभणी जिल्ह्यांतील सर्वच्या सर्व तर जालना, नांदेड व लातूर जिल्ह्यातील १३७४ गावांचा समावेश आहे. त्यामुळे आता प्राप्त परिस्थितीवर शासन काय निर्णय घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  मराठवाड्यातील ८५२५ गावांची खरिपाची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड व लातूर या जिल्ह्यांतील ३५७७ गावांची पैसेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १३५४, जालना जिल्ह्यातील ३५, परभणी जिल्ह्यातील ८४९, नांदेड जिल्ह्यातील ११६८, लातूर जिल्ह्यातील १७१ गावांची खरिपाची पैसेवारी ही ५० पैशापेक्षा कमी आली आहे. महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत लागवडीखालील एकूण ५६ लाख ५१ हजार ७६१ हेक्‍टर क्षेत्रापैकी खरिपात ५० लाख ९६ हजार ३३६ हेक्‍टरवर पेरणी झाली होती. ४ लाख ३८ हजार ९११ हेक्‍टर क्षेत्र यंदाच्या खरीपात पडिक होते. जालना जिल्ह्यातील जालना तालुक्‍यातील ३५ गावात खरिपात कमी पाउस तसेच पावसाचा खंड पडल्याने पिकाची उगवण आणि वाढ न झाल्याने त्या गावांमधील सुधारित पैसेवारी ५० पैशाच्या आत जाहीर करण्यात आली.  पैसेवारीचा थेट संबंध महसुलाची माफी किंवा स्थगितीशी येतो. त्यानंतर प्राप्त परिस्थितीनुसार दुष्काळ घोषीत करणे, त्याअनुषंगाने दुष्काळी उपाययोजना लागू करणे अपेक्षित असते. परतीच्या पावसाने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील काही प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा झाला असला तरी बहूतांश लघू, मध्यम प्रकल्पांची अवस्था बिकट आहे. पाणी साठलेल्या प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. संख्येने सर्वाधिक असलेल्या मराठवाड्यातील लघू प्रकल्पांमध्ये ३९ टक्‍क्‍यांच्या आत असलेला उपयुक्‍त पाणीसाठा मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची स्थिती दर्शविण्यास पुरेसा आहे. दुष्काळ जाहीर झाल्यास पिण्याचे पाणी, गुरांचा चारा, रोजगार निर्मीती करून हाताला काम देणे आदी बाबी राबविण्यावर प्राधान्याने जोर दिला जातो. त्याचबरोबर युद्धपातळीवर जलसंधारणाची कामे या निमित्ताने प्राधान्याने होणे अपेक्षीत असते. त्यामुळे महसूल विभागाकडून डिसेंबरच्या मध्यान्हात प्राप्त अंतिम पैसेवारीनंतर आता शासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  तालुकानिहाय ५० पैशाच्या आत अंतिम पैसेवारी (पैशात) औरंगाबाद जिल्हा : औरंगाबाद ४६, पैठण ४७, फुलंब्री ४२, वैजापूर ४७.३६, गंगापूर ४७, खुलताबाद ४५.७८, सिल्लोड ४७, कन्नड ४७.६०, सोयगाव ४५ परभणी जिल्हा परभणी ४१.१८, गंगाखेड ३९, पूर्णा ३८.०७, पालम ४१, पाथरी ४४.३८, सोनपेठ ४५, मानवत ४७.७७, सेलू ४९, जिंतूर ४७.६७ नांदेड जिल्हा कंधार ४६, लोहा ४६, हदगाव ४७, हिमायत नगर ४७, किनवट ४८, माहूर ४७, देगलूर ४८, मुखेड ४४, बिलोली ४८, नायगाव ४६ लातूर जिल्हा जळकोट........ ४४.३६ अहमदपूर....... ४७.४७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com