agriculture news in marathi 36 doors opened of 'Hatnur' | Page 3 ||| Agrowon

‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडले

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 जुलै 2021

जळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गुरुवारी (ता. २२) रात्री नऊला धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले.

जळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गुरुवारी (ता. २२) रात्री नऊला धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले. तापी नदीपात्रात ६२ हजार ६१३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. रात्री पाण्याचा विसर्ग काहीसा वाढला. 

शुक्रवारी (ता. २३) धरणाचे सकाळी ३६ दरवाजे उघडे होते. हतनूर धरणाचे गुरुवारी (ता. २२) सकाळी सातच्या सुमारास २० दरवाजे उघडण्यात आले. तापी नदीपात्रात ३४ हजार ७८५ क्यूसेक पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू झाला. त्यामुळे रात्री ३६ दरवाजे उघडण्यात आले. पाण्याचा प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हतनूर धरणाच्या खालील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये जाऊ नये, जनावरे सोडू नयेत, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले.  

तापी नदीचे उगमक्षेत्र मध्य प्रदेशातील बैतूल भागात आहे. सातपुडा पर्वतातील अनेक नाले, उपनद्या तापीला येऊन मिळतात. विदर्भातील पूर्णा नदीदेखील तापीला येऊन मिळते. या भागात चांगला पाऊस गेल्या आठवडाभरात झाला आहे. सध्या सातपुडा व मध्य प्रदेशात चांगला पाऊस सुरू आहे. यामुळे हतनूरचे दरवाजे उघडले आहेत. धरणात सध्या ५० टक्क्यांवर गाळ आहे. यामुळे त्यात फारसा जलसाठा होत नाही. 

‘अंजनी’चा पाणीसाठा ३२ टक्क्यांवर 

जिल्ह्यातील रावेरमधील सुकी, अभोरा, मंगरूळ हे मध्यम प्रकल्प, गारबर्डी लघु प्रकल्पांतील जलसाठादेखील वाढत आहे. तसेच यावलमधील मोर धरणातही पाण्याची किंचित आवक सुरू आहे. चोपड्यातील गूळ, धुळ्यातील अनेर धरणातही पाण्याची आवक झाली आहे. एरंडोलमधील अंजनी प्रकल्पातील साठाही ३२ टक्क्यांवर पोहोचला आहे.


इतर बातम्या
पोषक आहाराबद्दल जागरूकता महत्त्वाची :...सोलापूर ः ‘‘आपल्या सर्वांसाठी पोषक आहार आवश्यक...
‘रोहयो’तून विहिरी, शेतरस्त्यांची कामे...पांगरी, जि. सोलापूर ः ‘‘महाराष्ट्र ग्रामीण रोजगार...
सेंद्रिय परसबाग उभारून कुटुंबाची गरज...नाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
‘दुधना’च्या पुरामुळे हजारो हेक्टरवरील...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२...
परभणी जिल्ह्यात पीक नुकसानीच्या विमा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...