agriculture news in Marathi 36 lac quintal cotton procurement of cotton in parbhani Maharashtra | Agrowon

परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल खरेदी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी जिल्ह्यातील सन २०१९-२० चा कापूस खरेदी हंगाम बुधवारी (ता.५) समाप्त झाला. 

परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी जिल्ह्यातील सन २०१९-२० चा कापूस खरेदी हंगाम बुधवारी (ता.५) समाप्त झाला. यंदा जिल्ह्यात कापूस राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ (फेडरेशन), भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय), खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक, कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील व्यापारी यांनी कोरोनापूर्वी आणि कोरोनानंतर मिळून एकूण १ लाख  ५९ हजार ४४५ शेतकऱ्यांच्या ३६ लाख ७७ हजार ५४९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून हमीभावानुसार या कापसाची किंमत १ हजार २२८ कोटी २२ लाख रुपये होते अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे यांनी दिली.

कोरोना साथीमुळे लॉकडाऊन सुरु करण्यात आल्यानंतर खुल्या बाजारातील कापसाच्या दरात मोठी घसरण झाली होती.त्यामुळे शेतकऱ्यांनी पणन महासंघ आणि सीसीआयच्या खरेदी केंद्रावर हमीभावाने कापूस विक्रीसाठी प्राधान्य दिले.गर्दी टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने शेतकरी नोंदणी करण्यात  आली होती.

सीसीआयतर्फे जिंतूर, सेलू, मानवत, सोनपेठ,पूर्णा, ताडकळस या सहा खरेदी केंद्रावर १० हजार ६७ शेतकऱ्यांच्या २ लाख ५७ हजार ६४.४० क्विंटल आणि फेडरेशनच्या परभणी, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड या चार केंद्रांवर १५ हजार ११७ शेतकऱ्यांच्या ४ लाख ६६ हजार ९९४.९२ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. खाजगी बाजारांत  ६ हजार ९०४ शेतकऱ्यांच्या ८२ हजार १.१० क्विंटल, बाजार समित्यांमधील व्यापाऱ्याकडून १८ हजार ४०७ शेतकऱ्यांच्या २ लाख ६० हजार ५७५.९० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.

कोरोनापू्र्वी १लाख ८ हजार ९४३ शेतकऱ्यांच्या २६ लाख १० हजार ८८९.२१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली तर कोरोनानंतर ५० हजार ५०२ शेतकऱ्यांच्या १० लाख ६६ हजार ६६०.३२ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.कृषी उत्पन्न बाजार समित्या तसेच जिनिंग उद्योजकांनी मान्सून शेडची उभारणी केली त्यामुळे पावसाळ्यात देखील शेतक-यांच्या कापसाची खरेदी करणे शक्य झाले.

सीसीआय कडून ७१२ कोटी ७१ कोटी रुपयाची आणि पणन महासंघाकडून ५१५ कोटी ५० कोटी रुपये  मिळून १ हजार २२८ कोटी २२ लाख रुपयांची कापूस खरेदी करण्यात आलेली आहे.कोरोनासाथीमध्ये जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर,विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खरेदी प्रक्रियेतील सर्व यंत्रणांमधील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी यांच्या सहकार्यामुळे यंदा विक्रमी कापूस खरेदी झाली असे सुरवसे यांनी सांगितले.

खरेदीदार निहाय एकूण कापूस खरेदी स्थिती (क्विंंटलमध्ये)

खरेदीदार  कापूस  शेतकरी संख्या
पणन महासंघ   ९४५६६०   ३१३१९
सीसीआय   १२९३४४२ ५४६४५
खाजगी बाजार ५१४५२७   २४७४०
थेट पणन परवानाधारक ३२२   ३२
बाजार समित्यांतील व्यापारी ९२३५९७   ४८७०९

 


इतर अॅग्रो विशेष
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...