देशातून ३६ लाख टन साखर निर्यात 

देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी आतापर्यंत ४२ लाख टनाचे सौदे केले आहेत. त्यापैकी निर्यातीसाठी ३६ लाख टन साखर गोदामांमधून बाहेर पडली आहे.
sugar
sugar

पुणे: देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी आतापर्यंत ४२ लाख टनाचे सौदे केले आहेत. त्यापैकी निर्यातीसाठी ३६ लाख टन साखर गोदामांमधून बाहेर पडली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  लॉकडाउनमुळे साखर उद्योग संकटात आला आहे. देशी बाजार ठप्प असल्याने निर्यातीकडे कारखान्यांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले की, निर्यातीसाठी यंदा एकूण ६० लाख टनाचे उद्दिष्ठ आहे. लॉकडाउनमुळे निर्यातीत अडचणी आल्या. मात्र, पुढे निर्यात वाढण्याची चिन्हे आहेत.  इंडियन शुगर मिल्स् असोसिएशनच्या (इस्मा) म्हणण्यानुसार, देशातील जादा साखर उत्पादनाची समस्या हाताळण्यासाठी केंद्राने इथेनॉल उत्पादन वाढविण्याची सूचना कारखान्यांना केली आहे. मात्र, इथेनॉल उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी नवे प्रकल्प सुरू करण्यात अडचणी आलेल्या आहेत.  महाराष्ट्रातील कारखान्यांना निर्यातीचा चांगला लाभ होत आहे. बहुतेक साखर इराण व इंडोनेशियाकडे पाठवली जात आहे. राज्यातील कारखान्यांना निर्यात वाढवावी लागेल. कारण, नव्या हंगामातील साखरेने गोदामे भरलेली आहेत.  ‘‘आगामी काळात देशाचे इथेनॉल उत्पादन वाढवण्याचे सरकारने जाहीर केलेले धोरण प्रत्यक्षात साकारण्यासाठी साखर कारखाने, तेल कंपन्या आणि बॅंकांनी एकत्र यावे लागेल. तसे करारनामे केले तरच उत्पादन वाढेल,’’ असे ‘इस्मा’चे म्हणणे आहे.  देशात आतापर्यंत २६५ लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत ३२६ लाख टन साखर तयार झाली होती. अर्थात, विविध राज्यांमध्ये अजूनही ६३ कारखान्यांचे गाळप सुरू आहे.  राज्याच्या साखर उत्पादनात घसरण  दरम्यान, साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार राज्याचे साखर उत्पादन यंदा ७७ लाख टनाने घसरले आहे. तरीही १२ हजार ५४८ कोटीचे पेमेंट शेतकऱ्यांना केले आहे. गेल्या हंगामात एकूण पेमेंट २२ हजार १७२ कोटी रुपयांचे झाले होते. राज्यात १४४ कारखान्यांनी यंदा १५ मेपर्यंत ५५० लाख टन उसाचे गाळप केले. त्यापासून ६१ लाख टनाच्या आसपास साखर तयार केली. याउलट गेल्या हंगामात ९५२ लाख टन ऊस गाळून १०७ लाख टन साखर तयार केली होती.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com