agriculture news in Marathi 36 ton sugar export from country Maharashtra | Agrowon

देशातून ३६ लाख टन साखर निर्यात 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मे 2020

देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी आतापर्यंत ४२ लाख टनाचे सौदे केले आहेत. त्यापैकी निर्यातीसाठी ३६ लाख टन साखर गोदामांमधून बाहेर पडली आहे.

पुणे: देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी आतापर्यंत ४२ लाख टनाचे सौदे केले आहेत. त्यापैकी निर्यातीसाठी ३६ लाख टन साखर गोदामांमधून बाहेर पडली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

लॉकडाउनमुळे साखर उद्योग संकटात आला आहे. देशी बाजार ठप्प असल्याने निर्यातीकडे कारखान्यांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले की, निर्यातीसाठी यंदा एकूण ६० लाख टनाचे उद्दिष्ठ आहे. लॉकडाउनमुळे निर्यातीत अडचणी आल्या. मात्र, पुढे निर्यात वाढण्याची चिन्हे आहेत. 

इंडियन शुगर मिल्स् असोसिएशनच्या (इस्मा) म्हणण्यानुसार, देशातील जादा साखर उत्पादनाची समस्या हाताळण्यासाठी केंद्राने इथेनॉल उत्पादन वाढविण्याची सूचना कारखान्यांना केली आहे. मात्र, इथेनॉल उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी नवे प्रकल्प सुरू करण्यात अडचणी आलेल्या आहेत. 

महाराष्ट्रातील कारखान्यांना निर्यातीचा चांगला लाभ होत आहे. बहुतेक साखर इराण व इंडोनेशियाकडे पाठवली जात आहे. राज्यातील कारखान्यांना निर्यात वाढवावी लागेल. कारण, नव्या हंगामातील साखरेने गोदामे भरलेली आहेत. 

‘‘आगामी काळात देशाचे इथेनॉल उत्पादन वाढवण्याचे सरकारने जाहीर केलेले धोरण प्रत्यक्षात साकारण्यासाठी साखर कारखाने, तेल कंपन्या आणि बॅंकांनी एकत्र यावे लागेल. तसे करारनामे केले तरच उत्पादन वाढेल,’’ असे ‘इस्मा’चे म्हणणे आहे. 

देशात आतापर्यंत २६५ लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत ३२६ लाख टन साखर तयार झाली होती. अर्थात, विविध राज्यांमध्ये अजूनही ६३ कारखान्यांचे गाळप सुरू आहे. 

राज्याच्या साखर उत्पादनात घसरण 
दरम्यान, साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार राज्याचे साखर उत्पादन यंदा ७७ लाख टनाने घसरले आहे. तरीही १२ हजार ५४८ कोटीचे पेमेंट शेतकऱ्यांना केले आहे. गेल्या हंगामात एकूण पेमेंट २२ हजार १७२ कोटी रुपयांचे झाले होते. राज्यात १४४ कारखान्यांनी यंदा १५ मेपर्यंत ५५० लाख टन उसाचे गाळप केले. त्यापासून ६१ लाख टनाच्या आसपास साखर तयार केली. याउलट गेल्या हंगामात ९५२ लाख टन ऊस गाळून १०७ लाख टन साखर तयार केली होती. 
 


इतर अॅग्रोमनी
खाद्यतेल आयातीत १२ टक्के घटपुणे ः देशात २०१९-२० (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) मध्ये...
चांगल्या बाजारभावासाठी ‘एनसीडीईएक्स’चा...शेतकऱ्यांसाठी दराचे संरक्षण (प्राइज इन्शुरन्स)...
‘जीआय’प्राप्त उत्पादनांच्या ब्रँडिंगवर...नाशिक : भारतीय शेतीमाल व खाद्यपदार्थांना जगभर...
ग्राहकांच्या अपेक्षेनुसार उत्पादन...सध्या शेतकरी कायद्यामध्ये बदल झाल्यानंतर करार...
जळगावच्या सुवर्ण बाजाराला झळाळीजळगाव ः शुद्धता, सचोटीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
सोयाबीनची चाल पाच हजारांकडे  पुणे ः देशांतर्गत बाजारातील कमी आवक, शिकागो बोर्ड...
बेदाणा दरात सुधारणासांगली ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून...
नाईक सूतगिरणीचा कंटेनर निघाला चीन,...पुसद, जि. यवतमाळ : लॉकडाउन काळात पिंपळगाव कान्हा...
बांगलादेशच्या वस्त्रोद्योगात चीनची मोठी...जळगाव ः भारतीय कापसाचा सर्वांत मोठा खरेदीदार...
साखर निर्यात यंदा ठरणार फायदेशीरकोल्हापूर : साखरेचा आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या...
सांगलीत हळदीची उलाढाल २८० कोटींनी घटलीसांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद...
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तांदळाची विक्रमी निर्यात होणार पुणे: देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस...
देशातून ३५ लाख कापूस गाठींची निर्यात...जळगाव ः जगभरात कापूस पिकाला नैसर्गिक फटका बसतच...
भारतातील तेलबियांची परिस्थितीभारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक...
बंगलोर रोझ, कृष्णपुरम वाणाचा दहा हजार...नाशिक : बंगलोर रोझ व कृष्णपुरम छोट्या आकाराच्या...
डाळींच्या दरात दहा टक्के वाढ मुंबई : पालेभाज्या, कांदा, बटाटा यांसह आता...
जागतिक कापूस उत्पादन घटणार; ...जळगाव ः जागतिक कापूस उत्पादन नव्या म्हणजेच २०२०-...