निफाडमधील ३६० शाळांचा परिसर तंबाखूमुक्त

निफाडमधील ३६० शाळांचा परिसर तंबाखूमुक्त
निफाडमधील ३६० शाळांचा परिसर तंबाखूमुक्त

नाशिक : तंबाखू नियंत्रण कायदा २००३ मधील कलम सहाच्या तरतुदीनुसार शैक्षणिक संस्थांपासूनच्या १०० मीटर्पयच्या परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी आहे. त्यानुसार शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाऊंडेशनतर्फे निफाड तालुक्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्यात आले. यावेळी ३६० शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यात आला.

शालेय विद्यार्थी कोणत्याही वाईट व्यसनात अडकू नयेत, तंबाखू जन्य पदार्थांच्या सेवनापासून ते दूर रहावेत, यासाठी हे अभियान राबविण्यात आले. तंबाखूमुक्त झालेल्या ३६० शाळांचा सन्मान सोहळा निफाड येथे झाला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, निफाड तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप कराड, उपजिल्हा रूग्णालय वैद्यकिय अधिक्षक डॉ. सुनील राठोर, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण जिल्हा सल्लागार डॉ. शिल्पा बांगर, फाऊंडेशनचे दीपक पाटील, संदीप देशमुख, संतोष लोखंडे, प्रशांत माने, अजय चव्हाण, नीरज बर्वे आदी उपस्थित होते.

डॉ. झनकर म्हणाल्या, ‘‘ निर्व्यसानाबात बालपणीच विद्यार्थ्यांवर संस्कार होणे अत्यंत आवश्यक आहे. तंबाखूमुक्त शाळेचा अतिशय स्तुत्य व दिशादर्शक उपक्रम राबविला आहे. निफाड प्रमाणेच जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी आपण संकल्प करुया.‘‘

एव्हारेस्ट फाऊंडेशनचे व्यवस्थापक संदीप देशमुख यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन केले. निफाड तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप यांनी दोन वर्षापासून हा कार्यक्रम तालुक्याच्या सर्व शाळांमध्ये सुरू करून शिक्षकांना प्रशिक्षण दिले. सोहळ्यापूर्वी सकाळी शालेय विद्यार्थ्यांची तंबाखू विरोधी पदयात्रा काढण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com