agriculture news in Marathi 3.63 lac costumers sent bills Maharashtra | Agrowon

राज्यातील तीन लाख ६३ हजार वीजग्राहकांनी पाठविले मीटर रिडिंग 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 मे 2020

लॉकडाऊनच्या काळात महावितरणच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील तीन लाख ६३ हजार वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अॅपद्वारे गेल्या एप्रिल महिन्याचे स्वतःहून मीटर रिडींग पाठविले आहे.

पुणे: लॉकडाऊनच्या काळात महावितरणच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील तीन लाख ६३ हजार वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अॅपद्वारे गेल्या एप्रिल महिन्याचे स्वतःहून मीटर रिडींग पाठविले आहे. या सर्व ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार महावितरणकडून वीज बिल दिलेले आहे. यामध्ये पुणे परिमंडलातील सर्वाधिक ६९ हजार ९१२ वीजग्राहकांचा समावेश आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाकडून लॉकडाऊनसारख्या प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून महावितरणने गेल्या २३ मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. यासोबतच वीजबिलांची छपाई करणे व त्याचे वितरण करणे देखील बंद करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडींग उपलब्ध होणे शक्य नसल्याने वीजग्राहकांनी सरासरीनुसार वीजबिल पाठविण्याचा निर्णय 
घेण्यात आला आहे.

मात्र, महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट व 'महावितरण' मोबाईल अॅपद्वारे वीजग्राहकांना मीटरच्या रिडींगचे फोटो पाठवून स्वतः रिडींग घेण्याची सोय उपलब्ध या रिडींगप्रमाणे वीजवापराचे अचूक बिल तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वीजग्राहकांनी मीटरच्या रिडींगचे फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी वीजग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाईलवर महावितरणकडून एसएमएस" पाठविला जात असून त्यामध्ये मीटर रिडींग पाठविण्याची मुदत नमूद करण्यात येत आहे. 

महावितरणच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या एप्रिल महिन्याच्या वीजवापराचे तब्बल ३ लाख ६३ हजार १०५ वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अॅपद्वारे दिलेल्या मुदतीमध्ये मीटर रिडींग पाठविले आहे. महावितरणने वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा.

महावितरणकडून प्रत्यक्ष रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु होईपर्यंत वीजग्राहकांनी मोबाईल अॅप व वेबसाईटमध्ये लॉगीन करून दिलेल्या मुदतीत मीटर रिडींगचा फोटो अपलोड करून मीटर रिडींग पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

स्वतःहून मीटर रिडींग पाठविलेल्या 
वीजग्राहकांची परिमंडलनिहाय संख्या 

पुणे परिमंडल ६९९१२, कल्याण ५८२१०, भांडूप ३७५४३, नागपूर २७७२०, नाशिक २५८३१, कोल्हापूर- २२७२८, बारामती २०९४१, जळगाव १७६६४, औरंगाबाद १६३७४, अकोला १३७६७, अमरावती १३५४०, चंद्रपूर ८८२४, कोकण ८५४२, नांदेड ७३४८, गोंदिया ७२६८. लातूर ६९६३ 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...