मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत ३६५ टॅंकर सुरू

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा लाख ५९ हजार १९२ लोकांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे.
 365 tankers started in six districts of Marathwada
365 tankers started in six districts of Marathwada

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा लाख ५९ हजार १९२ लोकांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. मराठवाड्यातील २८३ गावे व १२० वाड्यांमधील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लाग आहे. त्यांच्यासाठी ३६५ टँकर सुरू आहेत. 

या जिल्ह्यांत १३४ विहिरींचे टॅंकरसाठी, तर ११०७ विहिरींचे टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा औरंगाबाद, पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्याला बसत आहेत. या चार तालुक्यातील १५० गावे व ३२ वाड्यांतील ३ लाख २६ हजार ३२५ लोक टंचाईग्रस्त आहेत. त्यासाठी १४५ टँकर सुरू आहेत. या व्यतिरिक्त १५७ विहिरी अधिग्रहित आहेत. जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर, जाफराबाद, मंठा, अंबड तालुक्यातील ३९ गावे व १४ वाड्यांमधील ८४ हजार ६१५ लोकांसाठी ४९ टँकर सुरू आहेत. सोबतच जिल्ह्यातील ९३ विहिरी अधिग्रहित आहेत. 

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एका गावांत टंचाई आहे. त्यासाठी एका टॅंकर सुरू आहे. ३३ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. नांदेड जिल्ह्यातील ७ गावे व १७ वाड्यांमधील २३ हजार ३३३ लोकांसाठी २० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. शिवाय जिल्ह्यातील १२५ विहिरी अधिग्रहित आहेत.

बीड जिल्ह्यातील सर्वाधिक टंचाईचा सामना करणाऱ्या आष्टी तालुक्यासह गेवराई, बीड, पाटोदा, अंबाजोगाई, केज, धारूर, पाटोदा नगर परिषद, नगर परिषद आष्टी आदी मिळून ७० गावे व ५६ वाड्यांमधील १ लाख ९६ हजार ३५६ लोक टंचाईग्रस्त आहेत. तिथे १३१ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील २३९ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.  लातूरमध्ये तीन टॅंकर सुरू 

लातूर जिल्ह्यातील देवणी व जळकोट तालुक्यातील दोन गावे व एका वाडीतील ४ हजार ३८२ लोकांसाठी तीन टँकरची सोय केली आहे. जिल्ह्यातील ३४८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, उमरगा, कळंब, भूम, परंडा आदी तालुक्यातील १४ गावांमधील २१ हजार ६८१ लोकांची तहान टँकरवर अवलंबून आहे. त्यासाठी १६ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. २४६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com