परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन
ताज्या घडामोडी
सोलापूर : शेतकऱ्यांनी भरले सहा कोटी रुपयांचे वीजबिल
महावितरणने शेतकऱ्यांसाठी कृषिपंपाच्या वीजबिल वसुलीसाठी जाहीर केलेल्या ‘कृषी धोरण -२०२०’या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सोलापूर : महावितरणने शेतकऱ्यांसाठी कृषिपंपाच्या वीजबिल वसुलीसाठी जाहीर केलेल्या ‘कृषी धोरण -२०२०’या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३ हजार ६९१ शेतकऱ्यांनी आतापर्यंत ६ कोटी १५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. ही योजना शेतकऱ्यांना समजावी म्हणून महावितरणच्या वतीने गावोगावी शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना कृषी योजनेचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
थकबाकीच्या मूळ बाकीवरील दंड-व्याजाच्या माफीनंतर आलेल्या सुधारित थकबाकीच्या केवळ ५० टक्केच रक्कम भरावयाची असल्याने शेतकऱ्यांकडून योजनेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, असा दावा महावितरणने केला आहे. शिवाय थकबाकीमध्ये वसूल झालेल्या रकमेतून ३३ टक्के गावातील व आणखी ३३ टक्के जिल्ह्यातीलच वीज यंत्रणेवर खर्च केली जाणार आहे, असे जाहीर करण्यात आल्याने त्याला प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी महावितरणकडून गावोगावी जनप्रबोधन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात योजनेनुसार १,९५३ कोटी थकीत
सोलापूर जिल्ह्यातील ३ लाख ६५ हजार ९९७ कृषीपंपधारकांकडे सप्टेंबर २०२० अखेरीस तब्बल ५ हजार १८९ कोटींची एकूण थकबाकी आहे. नवीन धोरणानुसार हीच थकबाकी ३ हजार ५९१ कोटींवर आली आहे. या थकबाकीच्या ५० टक्के अधिक सप्टेंबर-२० पासूनच्या चालू बिलापोटी १५५ कोटी असे मिळून १,९५३ कोटी इतकीच रक्कम भरावयाची आहे.
- 1 of 1064
- ››