मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणी

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सर्वसाधारण २ लाख ८ हजार ६३८ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ३७ टक्के अर्थात हजार १२९ हेक्‍टरवर खरीप ज्वारीची पेरणी झाली आहे.
 37% sowing of kharif sorghum in Marathwada
37% sowing of kharif sorghum in Marathwada

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सर्वसाधारण २ लाख ८ हजार ६३८ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ३७ टक्के अर्थात हजार १२९ हेक्‍टरवर खरीप ज्वारीची पेरणी झाली  आहे.

यंदाच्या खरीप हंगामात लातूर जिल्ह्यात खरीप ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ६२ हजार २३० हेक्टर होते. त्या तुलनेत प्रत्यक्षात १७ हजार ७७ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात १९ हजार ९९८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७ हजार ४१३ हेक्टरवर ज्वारीचा पेरा झाला. नांदेड जिल्ह्यात ५३ हजार २५० हेक्टरच्या तुलनेत ३१ हजार ४८१ हेक्टरवर ज्वारी पेरली गेली. 

परभणी जिल्ह्यात ९ हजार ९५९ हेक्टरच्या तुलनेत ५१०१ हेक्टरवर, हिंगोली जिल्ह्यात ४७ हजार ५४४ हेक्टरच्या तुलनेत केवळ १७ टक्के क्षेत्रावर अर्थात ७९९१ हेक्‍टरवर, बीड जिल्ह्यात ५८ हेक्टरच्या तुलनेत ७१७६ हेक्‍टरवर, तर जालना जिल्ह्यात ३१६ हेक्‍टरवर, औरंगाबाद जिल्ह्यात ६७४ हेक्‍टरवर खरीप ज्वारीची पेरणी केली असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

एक लाख हेक्‍टरवर बाजरी

मराठवाड्यात यंदा बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४३ हजार २३५ हेक्‍टर आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात १ लाख ९ हजार १९९ हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली. त्यात बीड जिल्ह्यातील ६२ हजार ९४ हेक्टर, जालना जिल्ह्यातील १२९६० हेक्टर, औरंगाबाद २९ हजार २३८ हेक्टर, लातूर ५५४ हेक्टर, उस्मानाबाद ३ हजार ६४९ हेक्टर, नांदेड २१ हेक्टर, तर परभणी जिल्ह्यातील हेक्‍टरवरील बाजरी पिकाचा समावेश आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com