रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारण

यंदा बाजार समितीकडे ३७ टन काजू बी तारण ठेवण्यात आली. बाजारातील दराच्या ७५ टक्क्यांप्रमाणे काजू बीसाठी किलोला ८५ रुपये दर मिळाला आहे.
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारण
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारण

रत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर उत्पादक शेतकऱ्यांकडील काजूसाठी शेतीमाल तारण कर्ज योजना जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. यंदा बाजार समितीकडे ३७ टन काजू बी तारण ठेवण्यात आली. बाजारातील दराच्या ७५ टक्क्यांप्रमाणे काजू बीसाठी किलोला ८५ रुपये दर मिळाला आहे.

कृषी पणन मंडळाच्या शेतीमाल तारण कर्ज योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाच्या काढणी हंगामात कमी भावाने विक्री न करता तो शेतीमाल बाजार समितीच्या गोदामामध्ये तारणात ठेवून शेतकऱ्यांना तारण कर्जाच्या स्वरूपात सुलभ आणि त्वरित कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल बाजार समितीच्या गोदामात तारण योजनेअंतर्गत ठेवण्यात येतो.

हंगामाच्या कालावधीत शेतीमाल एकाच वेळी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला जातो. त्यामुळे शेतीमालाचे बाजारभाव कमी होतात. शेतीमालास योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. मात्र काढणी हंगामात शेतीमालाची साठवणूक करून तो काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीस आणल्यास त्या शेतीमालास जादा बाजारभाव मिळू शकतो. तसेच शेतकऱ्यास हंगामाच्या वेळी असणारी आर्थिक निकड विचारात घेऊन त्यांना या गरजेच्यावेळी आर्थिक साह्य उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ शेतीमाल तारण कर्ज योजना राबवीत आहे.

गतवर्षी मिळाला अडीचपट दर गतवर्षी लॉकडाउन काळात काजू बीचे दर घसरले होते. बाजार समितीने ५६ रुपये किलोने तारण ठेवून शेतकऱ्यांना कर्ज दिले होते. ९३ टन काजू बी तारण ठेवण्यात येऊन ५३ लाख रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी काजू बीची विक्री केली असता किलोला १२० ते १३० रुपये किलो इतका अडीचपट दर प्राप्त झाला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com