Agriculture news in Marathi 37 tons of cashew seeds pledged in Ratnagiri | Agrowon

रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारण

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 एप्रिल 2021

यंदा बाजार समितीकडे ३७ टन काजू बी तारण ठेवण्यात आली. बाजारातील दराच्या ७५ टक्क्यांप्रमाणे काजू बीसाठी किलोला ८५ रुपये दर मिळाला आहे.

रत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर उत्पादक शेतकऱ्यांकडील काजूसाठी शेतीमाल तारण कर्ज योजना जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. यंदा बाजार समितीकडे ३७ टन काजू बी तारण ठेवण्यात आली. बाजारातील दराच्या ७५ टक्क्यांप्रमाणे काजू बीसाठी किलोला ८५ रुपये दर मिळाला आहे.

कृषी पणन मंडळाच्या शेतीमाल तारण कर्ज योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाच्या काढणी हंगामात कमी भावाने विक्री न करता तो शेतीमाल बाजार समितीच्या गोदामामध्ये तारणात ठेवून शेतकऱ्यांना तारण कर्जाच्या स्वरूपात सुलभ आणि त्वरित कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल बाजार समितीच्या गोदामात तारण योजनेअंतर्गत ठेवण्यात येतो.

हंगामाच्या कालावधीत शेतीमाल एकाच वेळी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला जातो. त्यामुळे शेतीमालाचे बाजारभाव कमी होतात. शेतीमालास योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. मात्र काढणी हंगामात शेतीमालाची साठवणूक करून तो काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीस आणल्यास त्या शेतीमालास जादा बाजारभाव मिळू शकतो. तसेच शेतकऱ्यास हंगामाच्या वेळी असणारी आर्थिक निकड विचारात घेऊन त्यांना या गरजेच्यावेळी आर्थिक साह्य उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ शेतीमाल तारण कर्ज योजना राबवीत आहे.

गतवर्षी मिळाला अडीचपट दर
गतवर्षी लॉकडाउन काळात काजू बीचे दर घसरले होते. बाजार समितीने ५६ रुपये किलोने तारण ठेवून शेतकऱ्यांना कर्ज दिले होते. ९३ टन काजू बी तारण ठेवण्यात येऊन ५३ लाख रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी काजू बीची विक्री केली असता किलोला १२० ते १३० रुपये किलो इतका अडीचपट दर प्राप्त झाला होता.

 


इतर ताज्या घडामोडी
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी...माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची...
सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे एकात्मिक...खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या...
तंत्र तीळ लागवडीचेतीळ पीक आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
नऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारीबुलडाणा ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या...
पावसाअभावी विदर्भात तीन टक्के...नागपूर : पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे विदर्भात...
आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधींनी आपली...कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आजपासून (ता. १६)...
‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ...नागपूर : विदर्भाचे भविष्य बदलविणारा मिहान प्रकल्प...
मेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा...अमरावती : धारणी तालुक्यातील चोपण या दुर्गम गावात...
सोलापुरात खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर : जिह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक...
मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या...
केंद्राने साखर निर्यातीसाठी अनुदान...शिराळा, जि. सांगली : केंद्र शासनाने साखर निर्यात...
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंतपुणे : पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...