Agriculture news in marathi 37,000 families in Shirol Migration notices | Page 3 ||| Agrowon

शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना स्थलांतरित होण्याच्या सूचना

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जून 2021

संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शिरोळ तालुक्यातील ४२ गावांतील ३७ हजार कुटुंबांना पुराच्या काळात सुरक्षितस्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. 

जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शिरोळ तालुक्यातील ४२ गावांतील ३७ हजार कुटुंबांना पुराच्या काळात सुरक्षितस्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. बाधित गावांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या मॅरेथॅान बैठका सुरू आहेत. ग्राम दक्षता समित्याही सक्रिय झाल्या आहेत.

गत महापुराचे अनुभव लक्षात घेऊन जीवित वा वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. बाधित गावांमध्ये पूर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. महापुराचा जिल्ह्यात सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसतो. या तालुक्यात कोट्यवधींचे नुकसान होते.

इतर वेळी जीवनदायिनी वाटणाऱ्या नद्या पावसाळ्यात मात्र धडकी भरवणाऱ्या ठरतात. तालुक्यातील ४२ गावांना पुराचा फटका बसतो. नियोजन करताना २००५ व २०१९च्या महापुराचे अनुभव प्रशासनाच्या कामी येत आहेत. त्या दृष्टीने उपाययोजना राबविल्या जात आहेत. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन तालुक्यातील ४२ गावांतील ३७ हजार कुटुंबांना आत्ताच इशारा देऊन सुरक्षित ठिकाणे शोधण्याची सूचना दिली 
जात आहे.

नागरिकांसह पशुधनाचीही विशेष दक्षता घेतली जात आहे. कोरोनाचे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. प्रशासनासह स्थानिक यंत्रणेची कसरत सुरू आहे. त्याचवेळी पुराचे संभाव्य संकट समोर दिसत आहे. गतवर्षी पुराचे संकट टळल्याने प्रशासनावरील ताण टळला होता. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनासह ग्रामदक्षता समित्या दक्ष झाल्या आहेत.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये शेवग्याला २००० ते ४५०० रुपये दरनगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली; दरात घटनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड ...रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर...
विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे...नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता...
मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या...
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत...आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत...
कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटकाकोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे...
परभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके...परभणी ः अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी...
केंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण...रायगड/रत्नागिरी : ‘‘तळिये गावात पंतप्रधान आवास...
समृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग बुलडाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच आता...
नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन नगर : नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे...
साताऱ्यात भूस्खलनात आतापर्यंत ३२ जणांचा...सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात...
आवक कमी दाखवून बाजार समितीची फसवणूक पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे,...
नदीकाठावरील ऊस वाहून गेलानेर्ले, जि. सांगली : बहे रामलिंग बेटाच्या...
अकोल्यातील २३३६ कर्जदार सावकारी...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या परवानाधारक सावकारी...
गोंदिया : पावसाअभावी दीड लाख हेक्‍...गोंदिया :  देशात मॉन्सूनचे आगमन होऊन दोन...
पुण्यात आले, टोमॅटो दरांत सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
वातावरण बदलात पारंपरिक वाण टिकवतील...भारतामधील भूजल साठ्यामध्ये सर्वांत श्रीमंत राज्य...
नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी...सोलापूर : ‘‘यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण...
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी...बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता....