राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी आवक 

ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत असल्याने गेल्या १३ जून ते २६ जुलै या दीड महिन्यात तब्बल ३७३ टीएमसी पाण्याची नव्याने आवक झाली आहे.
dinbhe dam
dinbhe dam

पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यामुळे ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत असल्याने गेल्या १३ जून ते २६ जुलै या दीड महिन्यात तब्बल ३७३ टीएमसी पाण्याची नव्याने आवक झाली आहे. सध्या एकूण तीन हजार २६७ प्रकल्पांमध्ये सुमारे ६८० टीएमसी (१९२६१.५२ दशलक्ष घनमीटर) म्हणजेच ४७ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी अवघा ३९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. 

राज्यात १३ जूनअखेरपर्यंत ३०७ टीएमसी (८७१२.९३ दशलक्ष घनमीटर) म्हणजेच २१.३७ टक्के पाणीसाठा होता. मात्र, २० जून ते ५ जुलै या कालावधीत पावसाने ओढ दिल्याने पाणीसाठा वाढला नव्हता. राज्यात ५ जुलैपर्यंत एकूण तीन हजार २६७ प्रकल्पांमध्ये सुमारे ३८९ टीएमसी (११०४०.१८ दशलक्ष घनमीटर) म्हणजेच २७ टक्के पाणीसाठा होता. सात जुलैपासून पावसाने कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला. कोकणात अक्षरश अतिवृष्टी झाल्याने धरणातील पाणीपातळीत मोठी वाढ झाली 

पुणे विभागात ६२ टक्के पाणीसाठा  मागील पंधरा ते वीस दिवसांपासून घाटमाथा व पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस बरसला. यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. कोयना धरण जवळपास भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या भागातील ७२६ धरणांत ३३५ टीएमसी म्हणजेच, ६२ टक्के पाणीसाठा झाला. गेल्या वर्षी विभागात अवघा ३३ टक्के पाणीसाठा होता. 

कोकणातील धरणांत मुबलक पाणीसाठा :  चालू महिन्यात कोकणातील बहुतांश भागांत अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे नद्या, ओढे भरून वाहत होते. रायगड, रत्नागिरी, घाटमाथ्यावरही पावसाच्या चांगल्याच सरी कोसळल्या होत्या. कोकणातील लहान मोठ्या असलेल्या एकूण १७६ प्रकल्पांत ७१.८० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सरासरी ५७ टक्के पाणीसाठा झाला. गेल्या वर्षी या काळात कोकणातील धरणांत ५६.४९ टक्के पाणीसाठा झाला होता. 

मोठ्या प्रकल्पांत ३२ टक्के साठा  कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशी जवळपास १४१ मोठी धरणे आहेत. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्याने या प्रकल्पांत ५८२ टीएमसी म्हणजेच ५७ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात अवघा ४३ टक्के पाणीसाठा होता. यंदा अमरावती विभागात ४६.९५ टीएमसी (५४ टक्के), औरंगाबाद विभागात ७०.२९ टीएमसी (४४ टक्के), पुणे विभागात ३०८ टीएमसी (७० टक्के), कोकण विभागात ५२.६२ टीएमसी (६० टक्के), नागपूर विभागात ५३.५२ टीएमसी (४३ टक्के), नाशिक विभागात ५२.७३ टीएमसी (३९ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. 

-------------  चौकट  विभागनिहाय धरणातील पाणीसाठा (टीमसीमध्ये) :  विभाग ---संख्या --- पाणीसाठा --- टक्के  अमरावती -- ४४६ --- ६२.९० --- ४३.०  औरंगाबाद -- ९६४ --- ८६.५३ -- ३३.२५  कोकण --- १७६ --- ७१.८० --- ५७.९५  नागपूर --- ३८४ -- ५८.६३ --- ३६.०५  नाशिक --- ५७१ -- ६४.२२ -- ३०.३  पुणे --- ७२६ -- ३३५.९१ -- ६२.५५ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com