agriculture news in Marathi 373 TMC water stock within one and half month Maharashtra | Page 3 ||| Agrowon

राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी आवक 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत असल्याने गेल्या १३ जून ते २६ जुलै या दीड महिन्यात तब्बल ३७३ टीएमसी पाण्याची नव्याने आवक झाली आहे.

पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यामुळे ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत असल्याने गेल्या १३ जून ते २६ जुलै या दीड महिन्यात तब्बल ३७३ टीएमसी पाण्याची नव्याने आवक झाली आहे. सध्या एकूण तीन हजार २६७ प्रकल्पांमध्ये सुमारे ६८० टीएमसी (१९२६१.५२ दशलक्ष घनमीटर) म्हणजेच ४७ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी अवघा ३९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. 

राज्यात १३ जूनअखेरपर्यंत ३०७ टीएमसी (८७१२.९३ दशलक्ष घनमीटर) म्हणजेच २१.३७ टक्के पाणीसाठा होता. मात्र, २० जून ते ५ जुलै या कालावधीत पावसाने ओढ दिल्याने पाणीसाठा वाढला नव्हता. राज्यात ५ जुलैपर्यंत एकूण तीन हजार २६७ प्रकल्पांमध्ये सुमारे ३८९ टीएमसी (११०४०.१८ दशलक्ष घनमीटर) म्हणजेच २७ टक्के पाणीसाठा होता. सात जुलैपासून पावसाने कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला. कोकणात अक्षरश अतिवृष्टी झाल्याने धरणातील पाणीपातळीत मोठी वाढ झाली 

पुणे विभागात ६२ टक्के पाणीसाठा 
मागील पंधरा ते वीस दिवसांपासून घाटमाथा व पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस बरसला. यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. कोयना धरण जवळपास भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या भागातील ७२६ धरणांत ३३५ टीएमसी म्हणजेच, ६२ टक्के पाणीसाठा झाला. गेल्या वर्षी विभागात अवघा ३३ टक्के पाणीसाठा होता. 

कोकणातील धरणांत मुबलक पाणीसाठा : 
चालू महिन्यात कोकणातील बहुतांश भागांत अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे नद्या, ओढे भरून वाहत होते. रायगड, रत्नागिरी, घाटमाथ्यावरही पावसाच्या चांगल्याच सरी कोसळल्या होत्या. कोकणातील लहान मोठ्या असलेल्या एकूण १७६ प्रकल्पांत ७१.८० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सरासरी ५७ टक्के पाणीसाठा झाला. गेल्या वर्षी या काळात कोकणातील धरणांत ५६.४९ टक्के पाणीसाठा झाला होता. 

मोठ्या प्रकल्पांत ३२ टक्के साठा 
कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशी जवळपास १४१ मोठी धरणे आहेत. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्याने या प्रकल्पांत ५८२ टीएमसी म्हणजेच ५७ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात अवघा ४३ टक्के पाणीसाठा होता. यंदा अमरावती विभागात ४६.९५ टीएमसी (५४ टक्के), औरंगाबाद विभागात ७०.२९ टीएमसी (४४ टक्के), पुणे विभागात ३०८ टीएमसी (७० टक्के), कोकण विभागात ५२.६२ टीएमसी (६० टक्के), नागपूर विभागात ५३.५२ टीएमसी (४३ टक्के), नाशिक विभागात ५२.७३ टीएमसी (३९ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. 

------------- 
चौकट 
विभागनिहाय धरणातील पाणीसाठा (टीमसीमध्ये) : 
विभाग ---संख्या --- पाणीसाठा --- टक्के 
अमरावती -- ४४६ --- ६२.९० --- ४३.० 
औरंगाबाद -- ९६४ --- ८६.५३ -- ३३.२५ 
कोकण --- १७६ --- ७१.८० --- ५७.९५ 
नागपूर --- ३८४ -- ५८.६३ --- ३६.०५ 
नाशिक --- ५७१ -- ६४.२२ -- ३०.३ 
पुणे --- ७२६ -- ३३५.९१ -- ६२.५५ 


इतर बातम्या
मराठवाड्यात नुकसानग्रस्त पिकांचे ६७.२६...औरंगाबाद : प्राथमिक अंदाजात जवळपास १५ लाख हेक्‍...
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त...नांदेड : जिल्ह्यात जुले, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये...
जळगावातील धरणांत ८० टक्के उपयुक्त...जळगाव ः जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत लावलेल्या...
ऊसबिलाचे तुकडे पाडू  दिले जाणार नाहीत...सातारा : ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाहीत,...
'लासलगाव'च्या कांद्याला टपाल पाकिटावर...नाशिक : कांदा पिकासाठी लासलगाव परिसराची राष्ट्रीय...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...