agriculture news in Marathi, 374 well subsidy for backward class farmers, Maharashtra | Agrowon

मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरींसाठी ३७४ कोटी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

पुणे  : राज्यातील मागास गटातील शेतकऱ्यांना सिंचनावर आधारित आधुनिक शेतीकडे वळवण्यासाठी यंदा ३७४ कोटी रुपयांचे अनुदान वाटले जाणार आहे. यातून नवीन विहिरी, बोअरवेल व ड्रीपच्या सुविधा दिल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मागास गटातील शेतकऱ्यांना समृद्ध करायचे असल्यास शेती उत्पादन वाढवावे लागेल. मात्र सिंचन सुविधा व आधुनिक तंत्राचा वापर केल्याशिवाय उत्पादन वाढणार नाही, अशी शिफारस यापूर्वी अभ्यासगटाने केली होती. त्यावर धोरणात्मक स्वरूपाच्या दोन स्वतंत्र योजना तयार केल्या गेल्या. त्यातून राज्यात किमान १२ हजार नवे प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे.

पुणे  : राज्यातील मागास गटातील शेतकऱ्यांना सिंचनावर आधारित आधुनिक शेतीकडे वळवण्यासाठी यंदा ३७४ कोटी रुपयांचे अनुदान वाटले जाणार आहे. यातून नवीन विहिरी, बोअरवेल व ड्रीपच्या सुविधा दिल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मागास गटातील शेतकऱ्यांना समृद्ध करायचे असल्यास शेती उत्पादन वाढवावे लागेल. मात्र सिंचन सुविधा व आधुनिक तंत्राचा वापर केल्याशिवाय उत्पादन वाढणार नाही, अशी शिफारस यापूर्वी अभ्यासगटाने केली होती. त्यावर धोरणात्मक स्वरूपाच्या दोन स्वतंत्र योजना तयार केल्या गेल्या. त्यातून राज्यात किमान १२ हजार नवे प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून २७३ कोटी ६२ लाख रुपये अनुदान मिळेल. अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून आदिवासी क्षेत्रात ६५ कोटी ८७ लाख रुपये, तर बिगर आदिवासी क्षेत्रात ३४ कोटी ८३ लाख रुपये अनुदान वाटले जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावे लागतील. 

राज्यातील जिल्हा परिषदांच्या कृषी विभागाकडे या योजना राबविण्याचे काम दिले गेले आहे. मात्र शेतकरी www.agriwell.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर थेट अर्ज भरू शकतात. गेल्या वर्षी २७ हजार शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते. त्यात कृषी स्वावलंबन योजनेतून १२ हजार १३१ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर केले गेले. आदिवासी क्षेत्रातील अनुदानासाठी तीन हजार १२६ अर्ज, तर बिगर आदिवासी क्षेत्रातील एक हजार ४४३ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. 

कशासाठी किती अनुदान मिळणार?
नव्या विहिरी खोदाईला अडीच लाख तर विहीर दुरुस्तीला ५० हजारांपर्यंत अनुदान. शेततळ्याच्या प्लॅस्टिक कागदासाठी एक लाख, पीव्हीसी पाइपला ३० हजार, इनवेल बोअरवेलसाठी २० हजार, पंपसंचासाठी १० हजार, तर वीज कनेक्शनला दहा हजार, ठिबकला ५० हजार, तर स्प्रिंकलरला २५ हजार रुपये.

कोणती कागदपत्रे द्यावी लागतील 
वार्षिक उत्पन्न दीड लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, तसेच सातबारा व आठ ‘अ’चा उतारा, शेतजमीन किमान २० आर किंवा कमाल सहा हेक्टर हवी. मात्र नवी विहीर असल्यास किमान ४० आर जमीन हवी. 

पीव्हीसी पाइपसाठी ५० हजार अनुदान
अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना नव्या विहिरीला अडीच लाख व विहीर दुरुस्तीसाठी कमाल ५० हजारांपर्यंत अनुदान मिळेल. याशिवाय परसबागेला ५०० रुपये, ठिबकसंचाला ५० हजार, तुषार संचाला २५ हजार, बोअरिंगसाठी २० हजार, शेततळ्याच्या प्लॅस्टिक कागदासाठी एक लाख, पीव्हीसी किंवा एचडीपीई पाइपला ३० हजार वीज कनेक्शनला दहा हजार रुपये मिळतील.


इतर ताज्या घडामोडी
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...