नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) संरक्षित शेतीत वापरल्या जात असलेल्या अनेक घटकांना
बातम्या
सिंधुदुर्गमध्ये ३७५ बंधारे पूर्ण
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने या वर्षी ६ हजार २०० वनराई आणि कच्चे बंधारे बांधण्याचे उद्दिष्टे ठेवले आहे. त्यापैकी २२५ कच्चे आणि ९० वनराई बंधारे असे एकूण ३७५ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने या वर्षी ६ हजार २०० वनराई आणि कच्चे बंधारे बांधण्याचे उद्दिष्टे ठेवले आहे. त्यापैकी २२५ कच्चे आणि ९० वनराई बंधारे असे एकूण ३७५ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत.
जिल्ह्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो परंतु पडलेल्या पावसाचे पाणी थेट समुद्रात वाहून जाते. त्यामुळे दर वर्षी जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात पाणीटंचाई भासते. या टंचाईची झळ कमी बसावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील नदी, नाल्यांमध्ये बंधारे घालून पाणी साठवण केले जाते. लोकसहभागातून वनराई आणि कच्चे बंधारे घातले जातात. या बंधाऱ्यांचा परिणाम देखील गेल्या काही वर्षात सकारात्मक जाणवला आहे.
या वर्षी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यात ६ हजार २०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्टे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना विभागून देण्यात आले आहे. कणकवलीत १ हजार, कुडाळ १ हजार, दोडामार्ग ४००, वेंगुर्ले-५००, मालवण-१ हजार, देवगड-९००, सावंतवाडी-१ हजार, वैभववाडी-४००, असे बंधाऱ्यांचे उद्दिष्टे निश्चित करण्यात आले आहे. परंतु आतापर्यंत कणकवली तालुक्यात १५०, कुडाळ तालुक्यात १४२ अन्य तालुक्यांमध्ये फक्त ८३ बंधारे बांधण्यात आले आहेत. दोडामार्ग आणि वैभववाडी तालुक्यांत अद्याप एकही बंधारा बांधला नाही.
प्रतिक्रिया..
जिल्ह्यात आतापर्यंत २२५ कच्चे बंधारे आणि ९० वनराई बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. एकूण ६ हजार २०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्टे आहे.
- मंगलदास चोडणकर, सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी, सिंधुदुर्ग,
- 1 of 1496
- ››