किसान सन्मान योजनेचे चिपळूणमध्ये ३७७ लाभार्थी अपात्र

प्राप्तिकर विभागाच्या यादीत नाव असलेल्या चिपळूण तालुक्यातील ३७७ शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. त्या शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल करण्याचे काम चिपळूण तहसीलदार कार्यालयाने सुरू केले आहे.
किसान सन्मान योजनेचे चिपळूणमध्ये ३७७ लाभार्थी अपात्र 377 disqualified beneficiaries of Kisan Sanman Yojana in Chiplun
किसान सन्मान योजनेचे चिपळूणमध्ये ३७७ लाभार्थी अपात्र 377 disqualified beneficiaries of Kisan Sanman Yojana in Chiplun

चिपळूण, जि. रत्नागिरी  : प्राप्तिकर विभागाच्या यादीत नाव असलेल्या चिपळूण तालुक्यातील ३७७ शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. त्या शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल करण्याचे काम चिपळूण तहसीलदार कार्यालयाने सुरू केले आहे. विशेष म्हणजे १२१ शेतकऱ्यांकडून १० लाख ९६ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत गरीब शेतकऱ्यांना महिना दोन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच काही निकष देखील ठरवण्यात आले होते. गावपातळीवर महसूल विभागाच्या माध्यमातून या योजनेसाठी कार्यवाही केली जात होती. स्थानिक गावपातळीवर ही योजना चांगलीच लोकप्रिय ठरली होती. अनेक शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज केले होते. सुरुवातीला त्यांच्या बँक खात्यात महिना दोन हजार रुपये जमा देखील होत होते. दरम्यान, शासनाने या योजनेचे सर्वेक्षण सुरू केले आणि त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेतलेल्या काही शेतकऱ्यांची नावे प्राप्तिकर विभागाच्या यादीत असल्याचे समोर आले आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्व यंत्रणा कामाला लागली. चिपळूण तहसील कार्यालयातून देखील या बाबत अहवाल मागवण्यात आला होता. hdjतालुक्यात तब्बल ३७७ शेतकरी या योजनेसाठी अपात्र असल्याचे समोर आले. तालुक्यातील ३७७ शेतकऱ्यांची नावे प्राप्तिकर विभागाच्या यादीत असल्याचे समोर येताच त्यांच्याकडून योजनेची रक्कम परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तशा कायदेशीर नोटिसा त्यांना पाठवण्यात आल्या असून वसुली सुरू झाली आहे. नोटीस मिळताच चिपळूणमधील १२१ शेतकऱ्यांनी १० लाख ९६ हजार इतकी रक्कम तहसील कार्यालयात जमा केली आहे. अन्य शेतकऱ्यांनी काही दिवसांची मुदत मागितली आहे.

प्रतिक्रिया

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा ज्यांनी बेकायदा लाभ घेतला आहे, त्या शेतकऱ्यांकडून वसुली सुरू झाली आहे. काहींनी रक्कम भरण्यासाठी मुदत मागितली आहे. त्या मुदतीत ती रक्कम त्यांनी भरली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. - तानाजी शेजाळ , नायब तहसीलदार, चिपळूण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com