agriculture news in Marathi 3780 crore FRP pending in state Maharashtra | Agrowon

राज्यात ३७८० कोटींची एफआरपी थकली 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

राज्यातील ५८ साखर कारखान्यांनी चालू हंगामात शेतकऱ्यांना तीन हजार ७८० कोटी रुपयांची एफआरपी अजूनही दिलेली नाही, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. 

पुणे: राज्यातील ५८ साखर कारखान्यांनी चालू हंगामात शेतकऱ्यांना तीन हजार ७८० कोटी रुपयांची एफआरपी अजूनही दिलेली नाही, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. 

३० एप्रिलपर्यंत कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीपोटी १२ हजार ७८५ कोटी रुपये चुकते करायला हवे होते. त्यातील ९४ टक्के म्हणजे १२ हजार ३६ कोटी रुपये रुपये देण्यात आले. साखर कारखान्यांचे गाळप आतापर्यंत ५४५ लाख टनापर्यंत पोहोचले आहे. 

साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना एफआरपी देण्याबाबत मार्चच्या मध्यापर्यंत अनुकूल स्थिती होती. साखरेचे स्थानिक दर चांगले होते. निर्यात व्यवस्थित चालू होती. त्यामुळे काही कारखाने एफआरपी वेळेत किंवा आधीच देण्याच्या स्थितीत होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे नियोजन कोलमडले, असे साखर महासंघाचे म्हणणे आहे. 

कोरोनामुळे थकली एफआरपी 
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केंद्र सरकारकडून हा मुद्दा सोडविता येणे शक्य असल्याचे सांगितले. कारखान्यांची इच्छा असूनही यंदा शेतकऱ्यांची एफआरपी काही प्रमाणात थकीत राहण्यास कोरोनाचे संकट कारणीभूत असल्याचे ते म्हणाले. 

निर्यात अनुदानासाठी केंद्राकडे पाठपुरावा 
एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना त्यांची साखर विकली जाणे क्रमप्राप्त आहे. लॉकडाऊनमुळे साखरेला उठाव नाही. निर्यात ठप्प आहे. त्यामुळे कारखान्यांचा अंतर्गत आर्थिक स्त्रोत बंद झालेले आहेत. केंद्र सरकारने कारखान्यांचे थकीत निर्यात अनुदान तातडीने अदा केल्यास शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी निधी प्राप्त होवू शकतो. त्यासाठी आमचा केंद्राकडे सतत पाठपुरावा सुरू आहे, असे प्रकाश नाईकनवरे यांनी स्पष्ट केले.


इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...