agriculture news in marathi, 38 thousand hectar crops affected in Satara district | Agrowon

सातारा ३८ हजार हेक्टरवरील पिके बाधित; कर्जाच्या डोंगराची चिंता
हेमंत पवार
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

कऱ्हाड, जि. सातारा : दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हुत्याचं नव्हतं करून टाकलं. दहा दिवसाहून अधिक काळ पाण्याखाली राहिलेल्याने पिके हातची गेली आहेत. पेरणीसाठी, खत, बियाणे खरेदीसह मशागतीसाठी केलेल्या कर्जाचा डोंगर कसा कमी करायचा या चिंतेने शेतकरी रात्र जागवत आहेत. जिल्ह्यात कृषी विभागाच्या नजरअंदाजाने खरिपातील ३८ हजार २२५ हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अजूनही पंचनामे सुरू असल्याने तो आकडा वाढणार आहे. 

कऱ्हाड, जि. सातारा : दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हुत्याचं नव्हतं करून टाकलं. दहा दिवसाहून अधिक काळ पाण्याखाली राहिलेल्याने पिके हातची गेली आहेत. पेरणीसाठी, खत, बियाणे खरेदीसह मशागतीसाठी केलेल्या कर्जाचा डोंगर कसा कमी करायचा या चिंतेने शेतकरी रात्र जागवत आहेत. जिल्ह्यात कृषी विभागाच्या नजरअंदाजाने खरिपातील ३८ हजार २२५ हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अजूनही पंचनामे सुरू असल्याने तो आकडा वाढणार आहे. 

जिल्ह्यात पूर्वेकडील काही तालुक्यांचा अपवाद वगळल्यास खरिपातील पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. पहिल्या टप्प्यात पेरणीनंतर चांगला पाऊसही झाला. त्यानंतर काहीशी उघडीप दिल्यावर उर्वरित पेरण्याही शेतकऱ्यांनी करून घेतल्या. त्यानुसार जिल्ह्यात मागील आठवड्यापर्यंत सोयाबीनची ५९ हजार १९६ हेक्टर, भुईमुगाची ३३ हजार २३०, भाताची ४१ हजार २६५, ज्वारीची १६ हजार ८७९, मक्याची ११ हजार ७८१, तृणधान्याची १ लाख ३२ हजार ३४७, कडधान्यांची ५४ हजार १७५, तीळ, सोयाबीन, कारळा, भुईमूग या गळीत धान्याची ९३ हजार २५६, उसाची २ लाख ९० हजार ४३२ अशी खरिपातील पिकांची ३ लाख ७० हजर ७४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची सरासरी टक्केवारी १०५. ३० टक्के आहे. त्यानंतर जो पावसाने सपाटा लावला तो चार दिवसापर्यंत कायम होता. 

मुसळधार पावसाने पिके पाण्याखाली गेली. मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून सोडलेल्या पाणयाने महापूर आला. त्यामध्ये तब्बल दहा दिवसांहून अधिक काळ शेती पिके पाण्याखाली राहिली. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे प्रपंच सांभाळून उद्‍ध्वस्त झालेली पिके सावरायचे मोठे संकट होते. मात्र निसर्गापुढे कोणाचेही काहीही चालत नाही याची अनुभूती शेतकऱ्यांना आली. त्यांनी आपल्या डोळ्यांदेखत पिके पाण्याखाली जाऊन वाया गेल्याची बघतली. त्यामुळे ते हताश झाले आहेत. पिके दहा दिवसांहून अधिक काळ पाण्याखाली राहिलेल्याने ती हातची गेली आहेत. त्यामुळे पेरणीसाठी, खत, बियाणे खरेदीसह मशागतीसाठी केलेल्या कर्जाचा डोंगर कसा कमी करायचा या चिंतेने शेतकरी रात्र जागवत आहेत. जिल्ह्यात कृषी विभागाच्या नजरअंदाजाने खरिपातील ३८ हजार २२५ हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अजूनही पंचनामे सुरू असल्याने तो आकडा वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. 

ओल्या दुष्काळाची मागणी   
सातारा जिल्ह्यातील माण, खटाव तालुक्यांचा अपवाद वगळता सर्वच तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. नदी, ओढ्याकाठची पिके तर दहा दिवसांहून अधिक काळ पाण्याखाली राहिल्याने ती वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे आहे. त्यासाठी आता पैसे आणायचे कोठून हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...