पीक नुकसान
पीक नुकसान

सातारा जिल्ह्यातील ३८ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

सातारा : पूरस्थितीमुळे सांगली, कोल्हापूरप्रमाणे सातारा जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नजर अंदाजानुसार जिल्ह्यातील ३८ हजार २२५ हेक्‍टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. हे नुकसान ३३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. भुईमूग, सोयाबीन, घेवडा पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.   जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील तालुक्‍यांत सलग दोन आठवडे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये ऊस, आले, हळद या नगदी पिकांसमवेत खरीप हंगामातील सोयाबीन, घेवडा, भुईमूग, कडधान्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला शेतीच्या नुकसानीचा नजर अंदाजानुसार सर्व्हे करण्यास सांगितले होते. त्यानुसार कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीमध्ये ३८ हजार २२५ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. हे नुकसान ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. यामध्ये खरीप पिकांचा सर्वाधिक समावेश आहे. कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांतील ऊस, आले, हळदीसोबत सर्व खरीप पिकांसह बागायती क्षेत्राचाही समावेश आहे. यासोबतच पुराच्या पाण्यामुळे किंवा अतिवृष्टीमुळे ११५ हेक्‍टर क्षेत्रावरील शेतीमध्ये माती वाहून आली आहे; तसेच आठ हेक्‍टर क्षेत्रावरील शेतीमध्ये डोंगरउतारावरील दगड वाहून आले आहेत.  आता या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचा अहवाल तयार केला जाणार आहे. सध्या कऱ्हाड, पाटणसह सातारा, जावळी, महाबळेश्‍वर आणि वाई तालुक्‍यांत खरीप पिके पाण्यात बुडाली आहेत. ही पिके कुजू लागल्याने पूर्ण वाया जाणार  आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com