agriculture news in Marathi, 38 thousand hector crop damage in Satara District, Maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यातील ३८ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

सातारा : पूरस्थितीमुळे सांगली, कोल्हापूरप्रमाणे सातारा जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नजर अंदाजानुसार जिल्ह्यातील ३८ हजार २२५ हेक्‍टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. हे नुकसान ३३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. भुईमूग, सोयाबीन, घेवडा पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

सातारा : पूरस्थितीमुळे सांगली, कोल्हापूरप्रमाणे सातारा जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नजर अंदाजानुसार जिल्ह्यातील ३८ हजार २२५ हेक्‍टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. हे नुकसान ३३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. भुईमूग, सोयाबीन, घेवडा पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील तालुक्‍यांत सलग दोन आठवडे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये ऊस, आले, हळद या नगदी पिकांसमवेत खरीप हंगामातील सोयाबीन, घेवडा, भुईमूग, कडधान्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला शेतीच्या नुकसानीचा नजर अंदाजानुसार सर्व्हे करण्यास सांगितले होते. त्यानुसार कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीमध्ये ३८ हजार २२५ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. हे नुकसान ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. यामध्ये खरीप पिकांचा सर्वाधिक समावेश आहे.

कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांतील ऊस, आले, हळदीसोबत सर्व खरीप पिकांसह बागायती क्षेत्राचाही समावेश आहे. यासोबतच पुराच्या पाण्यामुळे किंवा अतिवृष्टीमुळे ११५ हेक्‍टर क्षेत्रावरील शेतीमध्ये माती वाहून आली आहे; तसेच आठ हेक्‍टर क्षेत्रावरील शेतीमध्ये डोंगरउतारावरील दगड वाहून आले आहेत. 

आता या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचा अहवाल तयार केला जाणार आहे. सध्या कऱ्हाड, पाटणसह सातारा, जावळी, महाबळेश्‍वर आणि वाई तालुक्‍यांत खरीप पिके पाण्यात बुडाली आहेत. ही पिके कुजू लागल्याने पूर्ण वाया जाणार  आहेत. 

इतर बातम्या
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...