नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना ३८५ कोटींचे पीक कर्जवाटप

नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना ३८५ कोटींचे पीक कर्जवाटप
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना ३८५ कोटींचे पीक कर्जवाटप

नांदेड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सोमवार (ता. २९) पर्यंत ६७ हजार ४९७ शेतकऱ्यांना ३८५ कोटी ९० लाख रुपये (१९.६१ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक पीक कर्जवाटपात आघाडीवर आहे. जिल्हा बॅंकेने उद्दिष्टाचा टप्पा पार केला असून, एकूण ५० हजार ३६१ शेतकऱ्यांना २०० कोटी ४२ लाख रुपये पीककर्ज वाटप केले. राष्ट्रीयीकृत बॅंका, ग्रामीण बॅंक, खासगी बॅंका पीक कर्जवाटपात पिछाडीवर आहेत.

२०१९-२० च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंकांना १ हजार ९६७ कोटी ५१ हजार रुपये एवढे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. सोमवारपर्यंत राष्ट्रीयीकृत बॅंकांनी १ हजार ३६० कोटी ७ लाखांपैकी ६ हजार ७२४ शेतकऱ्यांना ७१ कोटी ५० लाख रुपये (५.२६ टक्के) कर्जवाटप केले. खासगी क्षेत्रातील बॅंकांनी १५१ कोटी ६७ लाखांपैकी ३ हजार ३८६ शेतकऱ्यांना ६३ कोटी १ लाख रुपये (४१.५४ टक्के) पीक कर्जवाटप केले.

महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने २७७ कोटी १७ लाखांपैकी ७ हजार २६ शेतकऱ्यांना ५० कोटी ९७ लाख रुपये (१८.३९ टक्के) पीक कर्जवाटप केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने १७८ कोटी ६० लाखांपैकी ५० हजार ३६१ शेतकऱ्यांना २०० कोटी ४२ लाख (११२.२२ टक्के), तर राष्ट्रीयीकृत बॅंकांची गती अतिशय संथ आहे. ग्रामीण बॅंकेचे कर्जवाटप २५ टक्के, तर खासगी बॅंकांचे पीक कर्जवाटप ५० टक्क्यांच्या आत आहे.

पीक कर्जवाटप स्थिती (कोटी रुपये)

बॅंक शेतकरी संख्या पीककर्ज टक्केवारी
राष्ट्रीयीकृत बॅंका ६७२४ ७७.५०  ५.२६
खासगी बॅंका ३३८६ ६३.०१ ४१.५४
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक ७०२६ ५०.३९  १८.३९
जिल्हा बॅंक ५०३६१   २००.४२ ११२.२२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com