‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी गुजरातला’

जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९० टक्क्यांपर्यंत पाऊस पडल्याचा दावा प्रशासन करते. चांगल्या पावसाने जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपयोगी ठरलेल्या हतनूर, वाघूर, गिरणा धरणात चांगला पाणीसाठा आहे.
388 million from Hatnur Cubic meter of water to Gujarat '
388 million from Hatnur Cubic meter of water to Gujarat '

जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९० टक्क्यांपर्यंत पाऊस पडल्याचा दावा प्रशासन करते. चांगल्या पावसाने जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपयोगी ठरलेल्या हतनूर, वाघूर, गिरणा धरणात चांगला पाणीसाठा आहे. आतापर्यंत यंदाच्या पावसाळ्यात नऊ वेळा हतनूर धरण भरले. त्यातून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी सुरतमार्गे गुजरातमध्ये वाहून गेले, अशी माहिती हतनूर धरणाचे कार्यकारी अभियंता एन. एम. महाजन यांनी दिली. 

यंदाच्या पावसाळ्यात मध्य प्रदेश, विदर्भात दमदार पाऊस झाल्याने हतनूर धरण भरले. त्यामुळे तापी नदीतून सतत दोन महिन्यांपासून पाणी सोडले जात आहे. हतनूर धरणाला उजवा कालवा आहे. मात्र, डावा कालवा नाही. डावा कालवा असता, तर गुजरातला जाणारे पाणी या कालव्याद्वारे सोडून जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढविता आले असते.  

हतनूर धरणात ६० ते ७० टक्के गाळ आहे. या गाळामुळे धरण शंभर टक्के भरू दिले जात नाही. पाणी पातळी वाढू लागते तसतसे पाणी दरवाजांद्वारे तापी नदीत सोडले जाते. शंभर टक्के भरून पाणी सोडल्यावर महापुराचा अनेक गावांना धोका असतो. यामुळे धरणातील पाण्याची लेव्हल वाढू लागताच दरवाजे उघडले जातात. 

यंदा धरणाचे ४१ दरवाजे दोन वेळ पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले. त्याद्वारे निघणारा जलप्रपात पाहण्यासारखा असतो. मागील महिन्यात सलग पाच दिवस ४१ दरवाजे उघडले होते. तापी नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. 

मध्य प्रदेशातील बैतूल प्रांतातून उगम पावणारी सूर्यकन्या तापी नदी खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी गंगा समजली जाते. तापीचा उगम मध्य प्रदेशातून झाला असला, तरी तिचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला आहे. 

पाणी अडविण्यात लोकप्रतिनिधी अपयशी 

तापी नदीचे पाणी अडविण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी ठरत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात तापी नदीचे सुमारे २०० ते ३०० टीएमसी पाणी गुजरातला वाहून जाते. तापीच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचा विचार केला, तर जळगाव जिल्ह्यातील हतनूर सिंचन प्रकल्पासारखे धरण नऊ वेळा भरेल, एवढे पाणी दरवर्षी डोळ्यांदेखत वाहून जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com