Agriculture news in marathi, 388 million from Hatnur Cubic meter of water to Gujarat ' | Page 5 ||| Agrowon

‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी गुजरातला’

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 सप्टेंबर 2021

जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९० टक्क्यांपर्यंत पाऊस पडल्याचा दावा प्रशासन करते. चांगल्या पावसाने जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपयोगी ठरलेल्या हतनूर, वाघूर, गिरणा धरणात चांगला पाणीसाठा आहे.

जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९० टक्क्यांपर्यंत पाऊस पडल्याचा दावा प्रशासन करते. चांगल्या पावसाने जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपयोगी ठरलेल्या हतनूर, वाघूर, गिरणा धरणात चांगला पाणीसाठा आहे. आतापर्यंत यंदाच्या पावसाळ्यात नऊ वेळा हतनूर धरण भरले. त्यातून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी सुरतमार्गे गुजरातमध्ये वाहून गेले, अशी माहिती हतनूर धरणाचे कार्यकारी अभियंता एन. एम. महाजन यांनी दिली. 

यंदाच्या पावसाळ्यात मध्य प्रदेश, विदर्भात दमदार पाऊस झाल्याने हतनूर धरण भरले. त्यामुळे तापी नदीतून सतत दोन महिन्यांपासून पाणी सोडले जात आहे. हतनूर धरणाला उजवा कालवा आहे. मात्र, डावा कालवा नाही. डावा कालवा असता, तर गुजरातला जाणारे पाणी या कालव्याद्वारे सोडून जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढविता आले असते.  

हतनूर धरणात ६० ते ७० टक्के गाळ आहे. या गाळामुळे धरण शंभर टक्के भरू दिले जात नाही. पाणी पातळी वाढू लागते तसतसे पाणी दरवाजांद्वारे तापी नदीत सोडले जाते. शंभर टक्के भरून पाणी सोडल्यावर महापुराचा अनेक गावांना धोका असतो. यामुळे धरणातील पाण्याची लेव्हल वाढू लागताच दरवाजे उघडले जातात. 

यंदा धरणाचे ४१ दरवाजे दोन वेळ पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले. त्याद्वारे निघणारा जलप्रपात पाहण्यासारखा असतो. मागील महिन्यात सलग पाच दिवस ४१ दरवाजे उघडले होते. तापी नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. 

मध्य प्रदेशातील बैतूल प्रांतातून उगम पावणारी सूर्यकन्या तापी नदी खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी गंगा समजली जाते. तापीचा उगम मध्य प्रदेशातून झाला असला, तरी तिचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला आहे. 

पाणी अडविण्यात लोकप्रतिनिधी अपयशी 

तापी नदीचे पाणी अडविण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी ठरत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात तापी नदीचे सुमारे २०० ते ३०० टीएमसी पाणी गुजरातला वाहून जाते. तापीच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचा विचार केला, तर जळगाव जिल्ह्यातील हतनूर सिंचन प्रकल्पासारखे धरण नऊ वेळा भरेल, एवढे पाणी दरवर्षी डोळ्यांदेखत वाहून जात आहे.


इतर बातम्या
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५...
धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’...गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील...
तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे...नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे...
कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे ...पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी...
अनुदान वितरणासाठीची नवी प्रणाली सर्वत्र...पुणे ः कृषी योजनांसाठी दिलेल्या निधीचा उपयोग...
 पन्नास एकरांवर शुगरबीट लागवड कोल्हापूर : महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्याला...
कांडली ग्रामपंचायतीची सौरऊर्जेतून...अमरावती ः अचलपूर पंचायत समितीअंतर्गत कांडली...
  वखारच्या ऑनलाइन शेतीमाल तारण कर्जात...पुणे : राज्य वखार महामंडळाच्या ऑनलाइन (ब्लॉकचेन)...
हिंगोलीत सोयाबीन दरात सुधारणाहिंगोली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात ज्वारी, गहू,...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या (२०२१-...
डाळिंबाच्या सुकर वाटेसाठी गडकरी...जालना : संपूर्ण राज्यात महत्वाचे फळपीक असलेल्या...
अमरावती जिल्ह्याती ‘पीएम किसान’ची ५...अमरावती ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभ...
कृष्णाकाठावर मजुरांअभावी ऊस रोपांची लागणभिलवडी, जि. सांगली ः कृष्णाकाठावर उसाच्या कांडी...
कोल्हापूर, सांगलीत ‘कृषिपंप...कोल्हापूर  : गेल्या तीन दिवसांत कोल्हापूर व...
वीज पुरवठा सुरळीत  करण्यासाठी इंदापुरात...पुणे ः जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील थकबाकीदार...
खानदेशात पीककर्ज वितरणाला येईना गतीजळगाव ः  खानदेशात रब्बी हंगामासाठी पीक...
सोयाबीन दराची घोडदौड सुरूच राहणार पुणे ः तेलबिया आणि खाद्यतेलाच्या दारातील...
पुणे बाजार समितीचा वारणारांना चाप ः गरडपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे,...
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...